वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
ऑस्ट्रेलियन उद्योजकांना मेक इन इंडियासाठी आमंत्रित करत परस्परांच्या स्टार्टअप्स मध्ये सहभागी होण्याचे पियूष गोयल यांचे आवाहन
Posted On:
08 APR 2022 9:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी ऑस्ट्रेलियन उद्योजकांना मेक इन इंडियासाठी आमंत्रित केले आणि दोन्ही देशांनी परस्परांच्या स्टार्टअप्समध्ये सहभागी होत एकमेकांशी संलग्न असले पाहिजे, असे ते म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडे विलक्षण नवोन्मेष आणि संशोधन तसेच नवकल्पना आहेत आणि ते जगासमोर नेण्यासाठी भारताकडे प्रतिभा आहे ,हे त्यांनी अधोरिखित केले.
ऑस्ट्रेलियातून भारतात गुंतवणुकीचा प्रवाह अधिक वेगाने येईल, अशी आशा व्यक्त करत ते म्हणाले की. दोन देशांमधील विस्तारत असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम ऑस्ट्रेलिया आघाडीवर असू शकते.
"हा प्रदेश आणि भारत यांच्यातील जवळीक अधिक दृढ आर्थिक सहभागाची संधी प्रदान करते," असे गोयल यांनी आज पर्थमध्ये डेप्युटी प्रीमियर रॉजर कुक यांनी आयोजित केलेल्या उद्योजकांसोबतच्या स्नेहभोजनादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.
“एकत्र मिळून आपण आपली भौगोलिक राजकीय स्थिती अधिक बळकट करू आणि हिंद - प्रशांत क्षेत्रात शांतता, समृद्धी, स्थैर्य , शांतता राखण्यासाठी आणि विकास करण्यासाठी काम करू,” असे ते म्हणाले.
भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (Ind-Aus ECTA) उभय देशांमधील संबंधांना अधिक उंचीवर नेईल आणि या करारासंदर्भात वाटाघाटी करताना जी सहकार्याची आणि मैत्रीची भावना होती ती खरोखरच उल्लेखनीय होती, असे गोयल यांनी सांगितले.
S.Kane/S.Chavan/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1815078)
Visitor Counter : 190