इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सामाईक सेवा केंद्रे
Posted On:
06 APR 2022 3:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2022
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने (MeitY) 'डिजिटल इंडिया' या उपक्रमाअंतर्गत सामाईक सेवा केंद्रांचे जाळे उभारले आहे.
सामाईक सेवा केंद्र (CSC) प्रकल्पानुसार साधारणपणे अडीच लाख लोकसंख्येच्या ग्रामपंचायत परिसरात किमान एक सामायिक सेवा केंद्र उघडली जाणे अंतर्भूत आहे्. सरकारकडून नागरिकांना मिळणाऱ्या सेवा किंवा इतर नागरिककेंद्री ई सेवा नागरिकांना मिळाव्यात आहे, हे या मागील उद्दिष्ट आहे. ग्रामीण पातळीवरील उद्योजकांकडून हे मॉडेल चालवले जाते.
28 फेब्रुवारी 2022 रोजी देशभरात 4,63,705 सामाईक सेवा केंद्रे कार्यान्वित होती. प्रत्येक केंद्रात साधारणपणे चार माणसे कार्यरत होती. यानुसार देशभरातील सार्वजनिक सेवा केंद्रांमध्ये मिळून थेट किंवा अप्रत्यक्ष असे एकूण सर्वसाधारण 15 लाख जण काम करतात.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1814075)
Visitor Counter : 325