आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 184 कोटी 66 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष वयोगटातील किशोरावयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 1 कोटी 85 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 13,013 आहे.

गेल्या 24 तासांत देशात 1,096 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.23%

Posted On: 03 APR 2022 9:20AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 184 कोटी 66 लाखांचा (1,84,66,86,260) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,21,24,040 सत्रांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 1.85 कोटीहून अधिक (1,85,44,700) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या गटनिहाय विभागणीत खालील मात्रांचा समावेश आहे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10403798

2nd Dose

10001500

Precaution Dose

4481443

FLWs

1st Dose

18413411

2nd Dose

17513441

Precaution Dose

6909797

Age Group 12-14 years

1st Dose

18544700

Age Group 15-18 years

1st Dose

57318623

2nd Dose

38502971

Age Group 18-44 years

1st Dose

554746168

2nd Dose

467085666

Age Group 45-59 years

1st Dose

202772979

2nd Dose

185602448

Over 60 years

1st Dose

126755452

2nd Dose

115606486

Precaution Dose

12027377

Precaution Dose

2,34,18,617

Total

1,84,66,86,260

 

देशभरात कोविड बाधितांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम ठेवत भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता कमी होऊन 13,013 झाली आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या केवळ 0.03% आहे.

परिणामी, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.76% आहे. गेल्या 24 तासांत 1,447 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता  4,24,93,773 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 1,096 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4,65,904 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 79.07 कोटीहून अधिक (79,07,64,883) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातील साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील सातत्याने कमी होत आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.23% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील 0.24%  इतका नोंदला गेला आहे.

***

SK/VJ/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1812925) Visitor Counter : 180