कोळसा मंत्रालय
2021-22 मध्ये कोळसा उत्पादन 777.23 दशलक्ष टनांवर पोहोचले
कंपन्यांच्या मालकीच्या खाण उत्पादनात 30% वाढ
18.43% वाढीसह कोळसा जावक 818.04 MT पर्यंत वाढली
Posted On:
01 APR 2022 7:08PM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालयाकडून मिळालेल्या तात्पुरत्या माहितीनुसार, 2021-22 मध्ये एकूण कोळसा उत्पादन 777.23 दशलक्ष टनावर (MT) पोहोचले आहे, जे 2020-21 मधील 716 दशलक्ष टनांच्या तुलनेत 8.55 टक्क्यांनी वाढले आहे.
कोल इंडिया लिमिटेड (CIL) चे उत्पादन 2020-21 मधील 596.24 दशलक्ष टनावरून 2021-22 आर्थिक वर्षात 4.43 टक्क्यांनी वाढून 622.64 दशलक्ष टन झाले आहे.
सिंगरेनी कॉलीरीज कंपनी लिमिटेड (SCCL) ने 28.55 टक्के वाढीसह 2021-22 मध्ये मागील वर्षीच्या 50.58 दशलक्ष टनांच्या तुलनेत 65.02 दशलक्ष टन उत्पादन केले. त्याच वेळी, कंपन्यांच्या मालकीच्या खाणींचे कोळसा उत्पादन 29.47 टक्क्यांच्या वाढीसह 89.57 दशलक्ष टन झाले आहे. 2020-21 मध्ये ते फक्त 69.18 दशलक्ष टन होते.
2021-22 मध्ये एकूण कोळशाची जावक 818.04 दशलक्ष टनावर पोहोचली , जी मागील वर्षीच्या 690.71 दशलक्ष टन च्या तुलनेत 18.43 टक्के अधिक आहे. या कालावधीत, कोल इंडिया लिमिटेड ने मागील वर्षीच्या 573.80 दशलक्ष टनाच्या तुलनेत 661.85 दशलक्ष टन कोळशाचा पुरवठा केला.
***
S.Kakade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1812503)
Visitor Counter : 239