कोळसा मंत्रालय
प्रल्हाद जोशी यांनी 18 नवीन खाणींसह 122 कोळसा/लिग्नाइट खाणींच्या लिलावाची सुरवात केली
Posted On:
30 MAR 2022 9:40PM by PIB Mumbai
कोळसा खाणींच्या व्यावसायिक लिलावा अंतर्गत कोळसा मंत्रालयाने 18 नवीन खाणींसह 122 कोळसा/लिग्नाइट खाणी लिलावाला खुल्या केल्या. लिलावाच्या पाचव्या भागाची सुरवात करताना केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, 42 खाणींचा यशस्वी लिलाव आतापर्यंत करण्यात आला आहे. देशाच्या उर्जा सुरक्षेबरोबरच यामुळे 1.17 लाखांपेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या देखील मिळतील, असे जोशी म्हणाले. या यशस्वी लीलावांतून असे दिसून आले आहे, की कोळसा क्षेत्राच्या वाढीला चलना देण्यासाठी योग्य पावले उचलत आहे.
लिलावासाठी उपलब्ध असललेल्या 109 खाणींपैकी, 59 खाणींची पूर्ण तपासणी झाली आहे तर 50 खाणींची अंशतः तपासणी झाली आहे. या खाणी कोळसा/लिग्नाइट साठे असलेल्या झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, बिहार आणि तेलंगणा या 11 राज्यांत आहेत.
विस्तृत चर्चा केल्यानंतर खाणींच्या यादीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे आणि संरक्षित क्षेत्रात, वन्यजीव अभयारण्यात, महत्वाच्या अधिवासात, 40% पेक्षा जास्त वनआच्छादन, मोठ्या प्रमाणात बांधकाम असलेल्या क्षेत्रातील खाणी यातून वगळण्यात आल्या आहेत.
***
S.Patil/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1811702)
Visitor Counter : 218