ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जून 2021 ते 14 मार्च 2022 पर्यंत 62.84 LMT पाम तेलाची आयात


केंद्राने ऱिफाईन्ड पाम तेलांची मोफत आयात करण्याची तारीख 31.12.2022 पर्यंत वाढवली

Posted On: 30 MAR 2022 6:36PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री सुश्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अशी माहिती दिली की, सरकारने 20डिसेंबर 2021 रोजी काढलेल्या अधिसूचना क्रमांक 46/2015-2020 द्वारे; ITC HS 15119010, 15119020 आणि 15119090 अंतर्गत रिफाईन्ड पाम तेलांची मोफत आयात करण्याची मुदत 31.12.2022 पर्यंत वाढविली आहे. 20 जून 2021 ते 14 मार्च 2022 या कालावधीत 62.84 एलएमटी पाम तेलाची आयात झाली होती,अशी  माहितीही यावेळी देण्यात आली.

देशांतर्गत उपलब्धता सुधारण्यासाठी आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने ओपन जनरल लायसन्स (OGL) अंतर्गत खाद्यतेलाच्या आयातीला परवानगी दिली आहे.

***

S.Patil/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1811604)
Read this release in: Tamil , English , Urdu , Telugu