रेल्वे मंत्रालय

एक स्थानक, एक उत्पादन

Posted On: 30 MAR 2022 3:52PM by PIB Mumbai

 

देशभरातील रेल्वे स्थानकांवर देशी आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची आणि भारतीय कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसंबंधी दुकाने उभारून या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक स्थानक, एक उत्पादनया संकल्पनेची सुरुवात करण्यात आली आहे. ही उत्पादने म्हणजे त्या त्या परिसराचे वैशिष्ट्य असतील आणि त्यामध्ये देशी जातीजमातींनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, स्थानिक विणकरांनी विणलेली हातमागाची उत्पादने, जगप्रसिद्ध लाकडाच्या कोरीवकाम केलेल्या वस्तू, कापडावरील चिकनकारी आणि जरी-जरदोजीसारखी कलाकुसर किंवा मसाल्याचे पदार्थ, चहा, कॉफी तसेच स्थानिक परिसरात स्वदेशी पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या आणि संपूर्ण प्रक्रिया केलेल्या अथवा अर्ध-प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांचा अथवा उत्पादनांचा समावेश असेल.

स्थानिक उत्पादकांची कौशल्ये तसेच उपजीविकेमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांची जाहिरात आणि विक्री करण्याच्या उद्देशाने निवडक रेल्वे स्थानकांवर स्टॉल, किऑस्क आणि दुकाने उभारण्याची योजना भारतीय रेल्वे विभागाने आखली आहे. सध्या या संदर्भातील प्रायोगिक तत्वावरील उपक्रमांच्या अंमलबजावणीचे काम सुरु असून या पातळीवर आवश्यक निधीचे मूल्यमापन करण्यात आलेले नाही.

रेल्वेच्या प्रत्येक विभागामध्ये 25 मार्च 2022 पासून हे प्रायोगिक प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. प्रत्येक स्थानकासाठी संदर्भित परिसर अथवा प्रदेशातील एक स्वदेशी उत्पादन निश्चित करण्यात आले असून या उत्पादनाच्या विक्रीसाठी त्या स्थानकावर जागा उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.  राज्यात नागपूर रेल्वे स्थानकावर बांबूपासून निर्मित उत्पादने ठेवण्यात आली आहेत.

या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या स्थानकांचा राज्यनिहाय तपशील सोबत जोडला आहे:

 

Identified Station

Identified product

State

Zone

Division

Patna Jn

Madhubani painting and related products

Bihar

ECR

Danapur

Visakhapatnam

Etikoppaka Toys (Wooden Toys)

Andhra Pradesh

ECoR

Waltair

Howrah

Tant Handloom Sarees + handloom textile

West Bengal

ER

Howrah

Guwahati

Assamese Gamocha

Assam

NFR

Lumding

Bengaluru

Channapatna wooden toys

Karnataka

SWR

Bangalore

Chennai Central

Kanchipuram saree

Tamil Nadu

SR

Chennai

Tirupati

Kalamkari Saree and textiles

Andhra Pradesh

SCR

Guntakal

Balasore

Coconut mat products

Odisha

SER

Kharagpur

Jaleshwar

Silver and stone jewellery

Odisha

SER

Kharagpur

Nagpur

Bamboo handicrafts

Maharashtra

CR

Nagpur

Rajkot

Terracotta/Ceramic products

Gujarat

WR

Rajkot

Kota

Kota Doria Sarees

Rajasthan

WCR

Kota

Bilaspur

Dokra Bell Metal handicraft products

Chattisgarh

SECR

Bilaspur

Gorakhpur

Terracotta handicrafts

Uttar Pradesh

NER

Lucknow

Banaras

Azamgarh Black pottery

Uttar Pradesh

NER

Banaras

Varanasi Cantt

Wooden toys

Uttar Pradesh

NR

Lucknow

Panipat

Handloom & Pickles

Haryana

NR

Delhi

Jaipur

Sanganeri print items & Jaipuri Razai

Rajasthan

NWR

Jaipur

Agra Cantt

Marble handicrafts

Uttar Pradesh

NCR

Agra

 

केंद्रीय रेल्वे, दळणवळण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

***

S.Thakur/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1811466) Visitor Counter : 344


Read this release in: English , Urdu , Bengali