आदिवासी विकास मंत्रालय
परीक्षा पे चर्चा-2022 कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एकलव्य आदर्श निवासी शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह केली नोंदणी
प्रविष्टि तिथि:
29 MAR 2022 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मार्च 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबतच्या परीक्षा पे चर्चा (पीपीसी ) - 2022 या एका अनोख्या संवादात्मक कार्यक्रमाचा 5वा भाग, यावर्षी 1 एप्रिल 2022 रोजी नवी दिल्ली येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याच्या अनुषंगाने, इयत्ता 9 वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी , शिक्षक आणि पालक यांच्यासाठी ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 28 डिसेंबर 2021 ते 3 फेब्रुवारी 2022 या कालावधीत MyGov या मंचाच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आदिवासी व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या एकलव्य आदर्श निवासी शाळांमधील (ईएमआरएस ) विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाला प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, एकलव्य आदर्श निवासी शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह नोंदणी केली.
शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचा हा उपक्रम असून यामध्ये पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि परीक्षेशी संबंधित त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम टीव्ही वाहिन्या आणि डिजिटल माध्यमांवर सकाळी 11 वाजता थेट प्रसारित केला जाईल.
* * *
S.Kakade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1811084)
आगंतुक पटल : 216