सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, आणि भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची स्पर्धात्मकता आणि विकास यावर एका भव्य आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन
केंद्रीय एमएसएमई मंत्री श्री नारायण तातू राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून या परीषदेचे उदघाटन करतील आणि केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री श्री भानू प्रताप सिंह वर्मा हे या परीषदेला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील
Posted On:
28 MAR 2022 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2022
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय(MSME) भारत सरकार आणि भारतीय उद्योजकता विकास संस्था (EDII), अहमदाबाद, यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 29 आणि 30 मार्च 2022 रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे एक भव्य आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आयोजित करणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत भारतातील आणि जगभरातील उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते, उद्योग धुरीण, विचारवंत, व्यावसायिक समूह, उद्योग संघटना, स्टार्टअप्स, सामाजिकतेवर प्रभाव टाकणाऱ्या संस्था, एमएसएईमईज(MSMEs)आणि स्वयं-सहायता गट सहभागी होणार आहेत.
परिषदेदरम्यान, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, कोविड-19 साथीच्या काळातील, एमएसएमई क्षेत्रातील आव्हाने आणि संधी, एमएसएमई क्षेत्रातील स्पर्धात्मकता, आणि एमएसएमई क्षेत्रातील शाश्वतता प्राप्त करण्यासाठी, तसेच एमएसएमईच्या वाढीमध्ये इनक्यूबेटर्स/चालनाकारकांची भूमिका, अनुकूल धोरणांची भूमिका आणि बिगर-आर्थिक व्यवसाय विकास सेवा आणि एमएसएमई एकत्रितपणे कसे कार्य करू शकतील, या विषयावर विचारमंथन करतील.
शाश्वतता हा एक प्रमुख कळीचा मुद्दा असल्याने, ‘एमएसएमई क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने लोक, ग्रह आणि नफा’ या विषयावर विशेष तज्ञांसह चर्चा करण्यात येणार आहे. ‘एमएसएमईंची स्पर्धात्मकता, भारतीय ‘एमएसएमईंचे आंतरराष्ट्रीयीकरण, तंत्रज्ञान आणि नाविन्य, ‘एमएसएमईंचे डिजिटल परिवर्तन, उद्योजकता परिसंस्था आणि ‘एमएसएमईच्या क्षेत्रातील उदयोन्मुख संधी आणि महिला आणि वंचित समुदायांची उद्योजकता यावरही यावेळी चर्चा केली जाईल.
* * *
S.Patil/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810647)
Visitor Counter : 231