इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग अभियानाअंतर्गत आयआयटी खरगपूर येथे पेटास्केल महासंगणक परम शक्तीचे राष्ट्रार्पण
Posted On:
28 MAR 2022 11:17AM by PIB Mumbai
नवी दिल्ली- 28 MAR 2022
आयआयटी खरगपूर येथील पेटास्केल महासंगणक परम शक्ती, राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग अभियानाअंतर्गत (NSM) राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे . इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. 27 मार्च 2022 रोजी या महासंगणकाचे उद्घाटन करण्यात आले.
आयआयटी खरगपूर आणि परिसरातील शैक्षणिक तसेच संशोधन व विकास संस्थांमधील वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात गणन क्षमतेची आवश्यकता भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर, परम शक्ती महासंगणन सुविधा डेटा सायन्सेस आणि संगणनविषयक बहुशाखीय क्षेत्रांमध्ये संशोधन व विकास क्रियाकलापांना गती देणारी आहे.
आयआयटी खरगपूर आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट इन अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (CDAC) यांच्यात मार्च 2019 मध्ये 17680 CPU कोर आणि 44 GPU सह ही अत्याधुनिक महासंगणन सुविधा स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या सुविधेने उच्च उर्जा वापर परिणामकारकता प्राप्त करण्यासाठी आरडीएचएक्स आधारित कार्यक्षम शीतकरण प्रणाली वापरण्याचा पाया घातला गेला आहे. या प्रणालीची आयआयटी खरगपूर आणि सीडॅक या दोघांनीही वैविध्यपूर्ण अनुप्रयोगांशी संबंधित व्यावसायिक, मुक्त-स्रोत आणि इन-हाऊस सॉफ्टवेअरसाठी मोठ्या प्रमाणावर चाचणी केली आहे.

***
ST/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810422)
Visitor Counter : 318