दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

5-जी स्पेक्ट्रम लिलावांना अंतिम रुप देण्यासाठी चर्चा

Posted On: 25 MAR 2022 2:41PM by PIB Mumbai

 

गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, अवकाश विभाग अशा सर्व विभागांच्या सचिवांच्या समितीने स्पेक्ट्रम वाटपासंदर्भात हे तंत्रज्ञान वापरणारी विविध मंत्रालये/विभाग यांच्याशी चर्चा केली आहे. उदयोन्मुख  तंत्रज्ञान/वापर (5जी/आयएमटी) आणि विविध महत्वाच्या बॅन्ड स्पेक्ट्रम वितरण  शिफारशीविषयी चर्चा करण्यात आली.  या सगळ्या चर्चेनुसार, दूरसंवाद विभागाने, दूरसंचार नियामक संस्था -ट्राय कडे 13-09-2021 कडे संदर्भ पाठवले असून, आंतरराष्ट्रीय मोबाईल दूरसंचार (IMT)/5G साठी फ्रिक्वेन्सी बॅन्ड साठी शिफारसी करण्यात आल्या.

केंद्र सरकारने 2022 साली, 5-जी स्पेक्ट्रम चे लिलाव करण्याचे नियोजन केले आहे.

दूरसंचार सेवा प्रदाते (TSPs) दिल्ली, मुंबई, जामनगर, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरु, लखनौ, गुडगाव, गांधीनगर, चंडीगढ, पुणे आणि वाराणसी  अशा शहरांसह, शहरी, उपनगरी आणि ग्रामीण भागात  5जी च्या चाचण्या घेत आहेत. देशभरातील विविध शहरांमध्ये व्यावसायिक/नेटवर्क 5-जी योजना सुरु करण्यासाठी, या चाचण्या सुरु आहेत.

केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंग चौहान यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1809682) Visitor Counter : 245


Read this release in: Gujarati , English , Urdu , Bengali