अंतराळ विभाग
अवकाश क्षेत्रातील भारताच्या हितसंबंधांचे रक्षण
Posted On:
23 MAR 2022 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2022
अवकाश विभागाच्या माध्यमातून, अवकाश क्षेत्रातील भारताच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तसेच त्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार सक्रियपणे प्रयत्न करत असते. त्यासाठी अवकाश वहन, पायाभूत सुविधा आणि त्याचा वापर अशा क्षेत्रात आपल्या सर्वांगीण क्षमता वाढवण्याचे काम सातत्याने केले जाते.
त्याशिवाय, भारतीय उपग्रहांचे तसेच कक्षेतील इतर साधनांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने, इस्रो, अवकाशातील वाढता कचरा कमी करण्याच्या सर्व आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये सहभाग घेत असते, जेणेकरुन, बाह्य अवकाश दीर्घकाळ, शाश्वत स्वरूपात वापरता येऊ शकेल.
अवकाशातील कचऱ्याचा अभ्यास आणि अवकाशाच्या स्थितीबाबत जागरुकता निर्माण करणाऱ्या आंतर-संस्था अवकाश कचरा समन्वय समिती(IDAC) सह, आयएएफ अवकाश कचरा कृती गट, आयएए अवकाश वाहतूक व्यवस्थापन कृती गट, आयएसओ अवकाश कचरा कृती गट आणि UNCOPUOS दीर्घकालीन कृती दल- अशा सर्व आंतरराष्ट्रीय संघटनांचा इस्रो सक्रिय सदस्य आहे.
केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन तसेच अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808700)
Visitor Counter : 257