उपराष्ट्रपती कार्यालय

शाश्वत विकास ध्येये गाठण्यात शैक्षणिक संस्थांनी अधिक व्यापक भूमिका निभावण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सर्वंकष अंमलबजावणीमुळे शाश्वत विकास ध्येयांसंदर्भातील उद्दिष्ट्ये गाठण्यात मदत होईल

भारतीय विद्यापीठ संघटनेच्या वार्षिक बैठकीचे आभासी पद्धतीने उद्घाटन करून उपराष्ट्रपतींनी बैठकीतील राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले

Posted On: 23 MAR 2022 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 मार्च 2022

 

शाश्वत विकास ध्येये गाठण्यात शैक्षणिक संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगत उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी महाविद्यालये आणि विद्यापीठांनी या संदर्भात अधिक व्यापक भूमिका बजावावी असे आवाहन केले.

भारतीय विद्यापीठ संघटनेच्या वार्षिक बैठकीचे आभासी पद्धतीने उद्घाटन करून उपराष्ट्रपतींनी या बैठकीत ‘उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून शाश्वत ध्येये समजून घेताना’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले. ते म्हणाले की, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी शाश्वत विकास ध्येये साध्य करण्यास मदत करतील अशा पद्धतींचा जाणीवपूर्वक स्वीकार केला पाहिजे.

शाश्वत विकासाबाबतच्या संयुक्त राष्ट्रांच्या 2030 पर्यंत साध्य करण्याच्या 17 शाश्वत विकास ध्येयांविषयीच्या कार्यधोरणाचा संदर्भ देत ते म्हणाले की, 2021 सालच्या शाश्वत विकास ध्येयांच्या निर्देशांकाच्या क्रमवारीत भारत 120 व्या स्थानी होता. विविध शाश्वत विकास ध्येये गाठण्यासाठी गरिबी आणि निरक्षरता अशा समस्यांची आव्हाने पार करण्याच्या गरजेवर अधिक भर देत उपराष्ट्रपतींनी नागरी समाज आणि शैक्षणिक संस्था यांच्यासह सर्व हितसंबंधींकडून एकवटलेले प्रयत्न झाले पाहिजेत असे सांगितले.  

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 हे अत्यंत दूरदर्शी दस्तावेज आहे असे निरीक्षण नोंदवत उपराष्ट्रपती म्हणाले की या धोरणाची सर्वंकष अंमलबजावणी आपल्याला शाश्वत विकास ध्येयांच्या बाबतीतील उद्दिष्ट्ये गाठण्यात मदत करेल.

भारतीय विद्यापीठांचे नाव जगातील सर्वोत्कृष्ट 10 विद्यापीठांच्या यादीत झळकावे ही त्यांच्या मनात खोलवर रुजलेली इच्छा व्यक्त करत त्यांनी देशातील सर्व विद्यापीठांना संशोधन, ज्ञान-निर्मिती यांच्यासह उच्च दर्जाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेचा मानदंड निश्चित करण्याचे आणि सर्वांना न्याय्य पद्धतीने शिक्षण मिळण्याची सुनिश्चिती करण्यासोबतच पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, भारतीय विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष कर्नल डॉ.जी.थिरूवासगम यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींचे संपूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Thakur/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1808634) Visitor Counter : 242