ऊर्जा मंत्रालय
वर्ष 2030 पर्यंत, देशातील एकूण ऊर्जानिर्मितीतील कोळशावर आधारित औष्णिक उर्जा निर्मितीचा वाटा 32% पर्यंत कमी करण्याचे सरकारचे नियोजन
Posted On:
22 MAR 2022 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 22 मार्च 2022
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, देशातील एकूण उर्जा निर्मितीच्या सर्व प्रकारांमध्ये सध्या कोळशावर आधारित औष्णिक उर्जा निर्मितीचा वाटा 52% आहे. वर्ष 2030 हा वाटा 32% पर्यंत कमी करण्याची योजना मंत्रालयाने तयार केली आहे.
ग्राहकांसाठीचे किरकोळ वीजदर संबंधित राज्य नियामकांकडून निश्चित होत असतात. विद्युत निर्मिती क्षेत्रात आता नवीकरणीय उर्जेचा समावेश झाला असल्याने या वीजेचे दर लक्षणीयरित्या कमी झाले आहेत. सौर उर्जेचा सध्याचा किमान दर 1 रुपया 99 पैसे आहे आणि हा दर कोळशावर आधारित अनेक प्रकल्पांतून मिळणाऱ्या विजेच्या दराहून कमी आहे.
सरकारने अक्षयऊर्जेचे औष्णिक आणि जलविद्युत प्रकल्पांशी एकत्रीकरण करणारी योजना सुरु केली आहे. त्यामुळे देखील ग्राहकांसाठी विजेचे दर कमी होण्यास मदत होत आहे.
तसेच हरित उर्जा कॉरिडॉर उभारण्यासाठी आणि कृषीक्षेत्रासाठीचे फीडर आणि पंप यांच्या सौरीकरणासाठी कुसुम योजनेअंतर्गत सरकार मदत अनुदान देखील दिले जात आहे.
केंद्रीय उर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय उर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808426)
Visitor Counter : 222