आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने आतापर्यंत 181.56 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 34 लाखापेक्षा जास्त बालकांचे लसीकरण

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 23,913 इतकी कमी झाली; भारताच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ती 0.06% आहे.

गेल्या 24 तासात देशभरात 1,581 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.39%

Posted On: 22 MAR 2022 9:10AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 181.56 (1,81,56,01,944) कोटी  लसींच्या मात्रांचा  टप्पा पार केला आहे.  2,14,38,677 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.


वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत  34 लाखापेक्षा जास्त (34,19,633) कोविड प्रतिबंधक लसमात्रा दिल्या आहेत. 


आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10403113

2nd Dose

9991704

Precaution Dose

4369373

FLWs

1st Dose

18412260

2nd Dose

17490858

Precaution Dose

6684262

Age Group 12-14 years

1st Dose

3419633

Age Group 15-18 years

1st Dose

56294499

2nd Dose

35814910

Age Group 18-44 years

1st Dose

553873437

2nd Dose

460202340

Age Group 45-59 years

1st Dose

202626402

2nd Dose

183959784

Over 60 years

1st Dose

126652374

2nd Dose

114583223

Precaution Dose

10823772

Precaution Dose

2,18,77,407

Total

1,81,56,01,944

 


देशात  कोविड रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. सध्या ती 23,913 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या  आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.06% इतकी आहे.


परिणामी, देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे. 

गेल्या 24 तासांत 2,741 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,24,70,515 झाली आहे. 

 

गेल्या 24 तासात देशभरात 1,581 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

 

गेल्या 24 तासात एकूण 5,68,471  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 78.36 (78,36,13,628) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.


साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.39% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.28% आहे.

  
****

Jaydevi PS/ VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1808038) Visitor Counter : 256