आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 181 कोटी 21 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


12-14 वयोगटातील एकूण 17 लाखांहून अधिक मुलांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

भारतातील सक्रिय रुग्णभार आज 26,240 इतका खाली आला असून सक्रीय रुग्णांची एकूण संख्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या 0.06%इतकी आहे

गेल्या 24 तासांत देशात 1,761 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.74%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.41% आहे

Posted On: 20 MAR 2022 9:24AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 181.21 हून अधिक  (1,81,21,11,675) मात्रा देण्यात आल्या आहेत.देशभरात 2,31,75,059 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

 

16 मार्च 2022 पासून 12-14 वयोगटातील मुलांना कोविड-19 लसींच्या  मात्रा देण्यास आरंभ झाला असून एकूण 17 लाख (17,36,464)बालकांना कोविड-19 लसीची पहिली मात्रा देण्यात आली.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,03,036

2nd Dose

99,90,377

Precaution Dose

43,58,282

FLWs

1st Dose

1,84,12,150

2nd Dose

1,74,88,506

Precaution Dose

66,63,768

Age Group 12-14 years

1st Dose

17,36,464

Age Group 15-18 years

1st Dose

5,62,03,581

2nd Dose

3,54,81,792

Age Group 18-44 years

1st Dose

55,37,77,249

2nd Dose

45,94,05,421

Age Group 45-59 years

1st Dose

20,26,11,031

2nd Dose

18,37,66,034

Over 60 years

1st Dose

12,66,42,354

2nd Dose

11,44,60,178

Precaution Dose

1,07,11,452

Precaution Dose

2,17,33,502

Total

1,81,21,11,675

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे:

 

भारतातील सक्रिय रुग्णभार सतत घसरत असून आज रूग्णसंख्या 26,240 इतकी खाली आला असून पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 0.06%इतकी आहे

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.74% आहे.गेल्या 24 तासांत 3,196 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,65,122 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 1,761 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात एकूण 4,31,973 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78 कोटी 22 लाखांहून अधिक (78, 26,60,658) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

सध्या देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात तसेच दैनंदिन पॉझिटीव्हिटी दरात सतत घसरण होत आहे.कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांत प्रमाण सतत खाली येत असून देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.41% आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.41%.इतका आहे.

***

ST/SP/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1807395) Visitor Counter : 267