रेल्वे मंत्रालय
विजेतेपद कायम राखण्यासाठी राष्ट्रीय भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत रेल्वे सहभागी होणार
Posted On:
18 MAR 2022 4:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2022
भुवनेश्वर (ओडिशा) येथे 19.03.2022 ते 31.03.2022 या कालावधीत वरिष्ठ राष्ट्रीय भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष आणि महिला)- 2021-22 आयोजित करण्यात आली आहे. या अजिंक्यपद स्पर्धेसाठी रेल्वे क्रीडा प्रोत्साहन मंडळ (आरएसपीबी), भारतीय रेल्वेची क्रीडा शाखा भारतीय रेल्वेच्या वतीने एक बळकट चमू पाठवणार आहे. 4 वर्षांपासून राष्ट्रीय भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय रेल्वेचा पुरुष संघ सातत्याने विजयी ठरला आहे आणि रेल्वेचा महिला संघ गेल्या 2 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेता ठरला आहे.
सुमारे 10000 क्रीडा कर्मचारी सुमारे 3000 क्रीडा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी असलेली भारतीय रेल्वेची क्रीडा शाखा ही देशातील पुरुष आणि महिला खेळाडूंची सर्वात मोठी नियोक्ता आहे.
टोक्यो ऑलिम्पिक 2020 मध्ये देशाला रौप्य पदक मिळवून देणारी आणि ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी भारतातील पहिली भारोत्तोलक ठरलेल्या एस. मीराबाई चानू सह अर्जुन पुरस्कार प्राप्त सतीश शिवलिंगम, रेणू बाला, संजीता चानू आणि भारोत्तोलनामधील अनेक प्रसिद्ध खेळाडू भारतीय रेल्वेने घडवले आहेत.
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807164)
Visitor Counter : 288