पंचायती राज मंत्रालय
पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते पंचायती राज मंत्रालयाच्या आपत्कालीन व्यवस्थापन योजनेचे उद्घाटन
Posted On:
17 MAR 2022 9:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मार्च 2022
केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह यांनी 17 मार्च 2022 रोजी पंचायती राज मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन योजनेचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले.
पंचायतींमध्ये अगदी प्राथमिक स्तरापासून आपत्कालीन संकटाला सामोरे जाण्यासाठी तयारी असावी आणि ग्रामीण भागातसुद्धा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उपाययोजनांशी मेळ असणारी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा विकसित व्हावी या उद्देशाने पंचायती राज मंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापन योजना तयार केली आहे असे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितले. सर्वसमावेशक आणि एकत्रित कृतीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन योजनेमुळे आपल्या देशात आपत्ती व्यवस्थापन सर्वसमावेशक पद्धतीने होऊ लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
आपत्ती व्यवस्थापनासाठीच्या तयारीत लोकांचा सहभाग असावा आणि अगदी प्राथमिक स्तरावरही आपत्ती निर्मूलनासाठी काही ना काही प्रयत्न व्हावेत असे आवाहन मंत्रीमहोदयांनी यावेळी केले. कोणत्याही आपत्त्कालीन आपत्ती व्यवस्थापनाच्या धोरणात जनसहभागाचे मोल ग्रामीण भागात जास्त आहे तर आपत्ती व्यवस्थापनात जनसहभागाचे सातत्य टिकणे महत्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पंचायत राज स्तरावर तसेच गावपातळीवर आपत्तीच्या वेळी संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी योग्य प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन धोरण असण्यावर त्यांनी भर दिला. देशातील पंचायतींच्या सर्वंकष विकासाचे धोरण ठरवताना आपत्ती व्यवस्थापन योजनेच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. आपत्ती व्यवस्थापनासाठी संस्थात्मक रचना, धोका, संकटाची तीव्रता आणि क्षमता यांचे विश्लेषण, संवेदनशील विकासाशी सुसंगत लवचिक आपत्ती व्यवस्थापन, हवामानबदल, आपत्तीच्या स्वरुपानुसार प्रतिबंध आणि आपत्ती प्रतिबंधक उपाययोजनांची जबाबदारी, ग्रामीण भाग आणि पंचायतींसाठी जनसहभागावर आधारित व्यवस्थापन योजना केंद्रस्थानी असणे यावर आपत्ती व्यवस्थापन योजनेत भर दिला आहे.
S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807061)
Visitor Counter : 320