अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

टाटा मेमोरियल सेंटर

Posted On: 16 MAR 2022 5:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मार्च 2022

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई ही भारत सरकारच्या अणुउर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदानप्राप्त संस्था आहे.

1.   टाटा स्मारक रुग्णालय, मुंबई

2.   कर्करोग उपचार, संशोधन आणि प्रशिक्षण प्रगत केंद्र, खारघर नवी मुंबई

3.   महात्मा पं मदनमोहन मालविय कर्करोग केंद्र, वाराणसी, उत्तरप्रदेश

4.   होमी भाभा कर्करोग रुग्णालय, वाराणसी, उत्तरप्रदेश

5.   होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र, संग्रुर, पंजाब

6.   होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र, मुल्लनपूर,पंजाब

7.   होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र, विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश

8.   डॉ बी बोरूह कर्करोग संस्था, गुवाहाटी, आसाम

9.   होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र मुझफ्फरपूर, बिहार

टाटा मेमोरियल सेंटर 40:60 च्या गुणोत्तर राखून उपचार देते तसेच सर्वसाधारण गटातील कर्करोगग्रस्त गरीब आर्थिक स्तरातील 60 टक्के रुग्णांना विनाशुल्क वा भरपूर अनुदान आधारित उपचार देते.

350 व्या संसदीय स्थायी समितीच्या सुचनेवरून अणुउर्जा विभाग आणि टाटा स्मारक केंद्र यांनी टाटा ट्रस्टच्या मदतीने विविध ठिकाणी अतिरिक्त केंद्रे (Hub and Spoke) उघडली आहेत.

कर्करोगाच्या उपचारासाठी राष्ट्रीय कर्करोग ग्रीडच्या माध्यमातून टाटा स्मारक केंद्र 250 सदस्य केंद्रातून सेवा पुरवित आहे. यामध्ये  आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाच्या अखत्यारीतील अनेक केंद्रांचा, अनेक राज्य आणि केंद्र सरकारी रुग्णालये भारतभरातील खाजगी रुग्णालये यांचा सहयोग आहे. याशिवाय टाटा मेमोरियल सेंटरने अनेकदा विविध राज्यांमध्ये कर्करोग केंद्र स्थापना आणि विकासासाठी संबंधित राज्य सरकारांना तंत्रज्ञानविषयक बाबींमध्ये मदतीचा हात दिला आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान व भूविज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

S.Thakur/V.Sahjrao/P.Malandkar


 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1806630) Visitor Counter : 294


Read this release in: English , Urdu , Telugu