भारतीय स्पर्धा आयोग

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) साउथ एल्म इन्व्हेस्टमेंट्स बी. व्ही ला मायक्रो लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिग्रहणास दिली मान्यता

Posted On: 16 MAR 2022 9:11AM by PIB Mumbai

भारतीय स्पर्धा आयोगाने ((सीसीआय) साउथ एल्म इन्व्हेस्टमेंट्स बी. व्ही ला मायक्रो लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिग्रहणास मान्यता दिली आहे. 
प्रस्तावित संयोजन, साउथ एल्म इन्वेस्टमेंट्स बीवी (एसईआय/ अधिग्रहणकर्ता) द्वारे मायक्रो लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड  (मायक्रो लाइफ/टार्गेट) मधे छोट्या भागीदारीच्या प्रस्तावित अधिग्रहणाशी संबंधित आहे.

एसईआय ही नेदरलँडच्या कायद्यांतर्गत अंतर्भूत केलेली गुंतवणूक होल्डिंग कंपनी आहे.  एसईआयचे भागधारक हे काही खाजगी इक्विटी फंड आहेत. वॉरबर्ग पिंकस एलएलसी त्यांचे व्यवस्थापन करते. 

लक्ष्य कंपनी, भारतात संचलित कंपनी आहे. ती प्रामुख्याने भारतातील खालील व्यावसायिक व्यवहारात सहाय्यक कंपन्यांसह कार्यरत आहे: 

(अ) स्टेंट, पर्क्यूटेनियस ट्रान्सल्युमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी कॅथेटर, हृदयाचे झडप, ऑर्थोपेडिक इम्प्लांट यासारख्या विविध श्रेणींमध्ये वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन आणि विक्री, आणि एंडो-सर्जरी उत्पादने (जसे की टाके, स्टेपलर, जाळी आणि अंतर्गर्भाशयी उपकरणे) या संबंधित चिकित्सा उपकरणे; 

(ब) इन-विट्रो डायग्नोस्टिक्स विश्लेषक आणि अभिकर्मक; आणि 
(क) भारतात ओव्हर द काउंटर (ओटीसी) उत्पादने जसे की कोविड स्व-चाचणी किट आणि गर्भधारणा चाचणी किट आदिंचे उत्पादन तसेच विक्री.  लक्ष्य कंपनी ( आपल्या सहाय्यक कंपन्यांद्वारे) रुग्णालयांना विशिष्ट वैद्यकीय उपकरणे (जसे की सर्जिकल रोबोट्स आणि अल्ट्रासोनिक ऊर्जा उपकरणे) पुरवते त्यासाठी बी2सी प्रारुपाचा अवलंब करते. याबरोबरच तिच्या इन-व्हिट्रो डायग्नोस्टिक, ऑर्थोपेडिक, एंडो-सर्जरी आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी उपायांकरिता संशोधन आणि विकास सुविधा आहेत.  

सीसीआयचा तपशीलवार आदेश लवकरच जारी केला जाईल.

 

***

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1806455) Visitor Counter : 226