रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हायड्रोजन आधारित प्रगत फ्युएल सेल इलेक्ट्रिक वाहनासाठीच्या (एफसीईव्ही) पथदर्शी प्रकल्पाचे नितीन गडकरी करणार उद्घाटन

Posted On: 15 MAR 2022 3:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2022

 

वेगवान आर्थिक विकास साधण्यासाठी स्वच्छ ऊर्जा आणि कार्बन उत्सर्जन कमी असणाऱ्या मार्गावर चालण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. हायड्रोजन हा उर्जा धोरणाचा मुख्य घटक आहे आणि कार्बन उत्सर्जन कमी राखणाऱ्या उर्जा मार्गांमध्ये महत्वाची भूमिका बजावेल. हरीत हायड्रोजन रस्ते वाहतुकीसह अनेक क्षेत्रांना डीकार्बोनाइज करण्याच्या मोठ्या संधी देते आणि जागतिक स्तरावर याचा वेग अभूतपूर्व आहे. हरीत हायड्रोजनद्वारे समर्थित वाहतूक हा भविष्यातील महत्त्वाचा तंत्रज्ञान पर्याय ठरणार आहे, विशेषत: मध्यम ते लांब पल्ल्यांसाठी सर्वात अनुकुल असलेल्या मोठ्या कार्स, बस, ट्रक, जहाजे आणि ट्रेनमध्ये हा योग्य पर्याय आहे. 

स्वयंपूर्णता मिळवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेवर आधारित आणि जीवाश्म इंधनापासून ते पर्यावरणाच्या संवर्धनाकडे  उर्जा संक्रमणासाठी  अनेक मार्गांचा अवलंब करून शाश्वततेला प्रोत्साहन देण्याच्या टोयोटाच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लिमिटेड इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) सोबत जगातील सर्वात प्रगत फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (एफसीईव्ही) टोयोटा मिराई या हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनाचा, भारतीय रस्ते आणि हवामान परिस्थितीशी सुसंगत अभ्यास आणि मूल्यमापन करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प करत आहे. 

हायड्रोजन, एफसीईव्ही तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता पसरवणे आणि भारतासाठी हायड्रोजन-आधारित समाजाला समर्थन देण्यासाठी त्याचे फायदे प्रसारित करणे हा उद्देश असलेला देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प असेल. 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 16 मार्च, 2022 रोजी दुपारी 2 वाजता नवी दिल्लीत अकबर रोड,

मोतीलाल नेहरू प्लेस इथे या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन करतील आणि टोयोटा मिराई एफसीईव्हीचे प्रात्यक्षिकही पाहतील. 


* * *

N.Chitale/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1806170) Visitor Counter : 269