सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमध्ये सुरत येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते सुमुल डेअरीच्या विविध योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी

Posted On: 13 MAR 2022 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मार्च 2022

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शहा यांनी आज  गुजरातमध्ये सुरत येथे  सुमुल डेअरीच्या विविध योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी  केली. यावेळी केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आज दक्षिण गुजरातच्या तापी जिल्ह्यात ऐतिहासिक सहकार  परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, या परिषदेला असलेली   लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि उत्साह गुजरातमध्ये सहकाराची बांधणी  किती बळकट आहे याचा दाखला देणारी आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष ,संकल्प करण्याचे वर्ष म्हणून साजरे करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी 130 कोटी जनतेला  केले आहे.स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात सर्व सहकारी संस्थांमधील  कामगारांसाठी सहकारी चळवळ बळकट करून या चळवळीला  जगातील सर्वात मजबूत सहकारी चळवळ बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे अमित शहा म्हणाले.

71 वर्षांपूर्वी 200 लिटर पासून सुरु झालेला सुमुलचा प्रवास आज 20 लाख लिटरपर्यंत पोहोचला आहे ज्यामध्ये दूध उत्पादक आदिवासी स्त्री-पुरुषांचे मोठे योगदान आहे. आदिवासी महिलांचे अथक परिश्रम आणि समर्पणामुळे आज दररोज 7 कोटीं रुपयांच्या दुधाची विक्री होते आणि हे 7 कोटी रुपये 2.5 लाख सभासदांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे,  असे केंद्रीय सहकार मंत्र्यांनी  सांगितले.

गुजरातच्या जनतेने सहकारामधील  चमत्कार पाहिला आहे.सरदार पटेल, त्रिभुवन भाई, भाई काका, वैकुंठभाई मेहता यांनी गुजरातमध्ये सहकार चळवळीचा मजबूत पाया रचला  आणि आज अमूल उद्योग  त्या पायावर उभा आहे.53,000 कोटी रुपयांच्या उलाढालीसह अमूल ब्रँड जागतिक ब्रँड बनला आहे. हे सहकार चळवळीचे सामर्थ्य दर्शवते, असे सहकारमंत्री म्हणाले.

सहकार मंत्री म्हणाले की, नैसर्गिक शेती हे आपले ध्येय असायला हवे असे मी नक्कीच म्हणेन. नैसर्गिक शेतीत करणाऱ्या  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची जबाबदारी सहकार मंत्रालयाची आणि मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि गुजरात सरकारचीही  आहे.सेंद्रिय शेतीच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा यासाठी अमूलच्या पुढाकाराने यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. उत्पादनाची विश्वासार्हता, वैज्ञानिक चाचणी, गुणवत्ता, प्रमाणीकरण आणि यासाठी अमूलने पुढाकार घेतला आहे. ही रचना वर्षभरात तयार केली जाईल आणि त्याद्वारे नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळेल हे सुनिश्चित केले जाईल.

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1805591) Visitor Counter : 221


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil