दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
"ट्राय (TRAI) कायद्याची 25 वर्षे: हितसंबंधितांसाठी (दूरसंचार , प्रसारण ,माहिती आणि तंत्रज्ञान भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण आणि आधार) पुढील वाटचाल " या विषयावरील परिसंवादाचे अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन
'अंत्योदय' आणि 'आत्मनिर्भर भारत' हे तत्त्वज्ञान आपल्या सरकारसाठी पुढची वाटचाल निश्चित करेल - अश्विनी वैष्णव
Posted On:
13 MAR 2022 7:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2022
दूरसंचार विवाद निपटारा आणि अपील न्यायाधिकरणाने (टीडीएसएटी ) आज नवी दिल्लीत "ट्राय (TRAI) कायद्याची 25 वर्षे: हितसंबंधितांसाठी (दूरसंचार , प्रसारण ,माहिती आणि तंत्रज्ञान भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण आणि आधार) पुढील वाटचाल " या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय ) कायद्याच्या 25 वर्षांच्या दीर्घ प्रवासानिमित्त आयोजित परिसंवादाचे उदघाटन केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले. भारतातील दूरसंचार क्षेत्राचे नियमन करण्यासाठी 1997 मध्ये,भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा लागू करण्यात आला.तसेच या कायद्यात दूरसंचार क्षेत्रातील हितधारकांमधील वादविवादांचा निपटारा करण्याची यंत्रणा देखील प्रदान केली आहे. या कायद्यात 2000 मध्ये सुधारणा करण्यात आली.दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून न्यायनिवाडा करणे आणि वादविवादाचा निपटारा करण्यासंदर्भातील कार्ये हाती घेण्यासाठी दूरसंचार विवाद निपटारा आणि अपील न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले.
हा परिसंवाद आयोजित केल्याबद्दल अश्विनी वैष्णव यांनी, दूरसंचार विवाद निपटारा आणि अपील न्यायाधिकरणाचे अभिनंदन केले.दूरसंचार क्षेत्राचे अनोखे वैशिष्ट्य अधोरेखित करत ते म्हणाले की, हे क्षेत्र स्पेक्ट्रममुळे अविनाशी आणि पूर्णपणे पुनर्वापर योग्य आहे. उच्च भांडवलाचे सघन स्वरूप, तंत्रज्ञानातील बदलांबद्दलची संवेदनशीलता आणि धोरणात्मक महत्त्व यांसारखी दूरसंचार क्षेत्रातील अन्य अनोखी वैशिष्ट्ये सांगत अश्विनी वैष्णव यांनी 25 वर्षांपूर्वी तयार करण्यात ट्राय कायदा काळाच्या तुलनेत आज अधिक प्रासंगिक झाला आहे.असे ते म्हणाले. आता संपूर्ण धोरणात्मक चर्चा कोविड नंतरच्या परिस्थितीनुसार परिभाषित असून त्यात डिजिटल तंत्रज्ञान अधिक महत्त्वाचे बनले आहे असे त्यांनी सांगितले.
'अंत्योदय' आणि सर्वसमावेशक विकास हे आपल्या सरकारचे निर्णय आणि उपक्रमांमागचे पहिले आणि प्रमुख तत्वज्ञान आहे आणि या विचाराने सरकारला देशातील डिजिटल दरी सांधायची आहे,असे सांगत त्यांनी धोरणे आणि उपक्रमांच्या बाबतीत सरकारची विचारप्रक्रिया स्पष्ट केली. 'आत्मनिर्भर भारत’ हे सरकारच्या धोरण आणि दृष्टिकोनासंदर्भात मार्गदर्शन करणारे दुसरे प्रमुख तत्त्वज्ञान आहे.इतर यंत्रणेच्या तुलनेत कमी खर्चात भारतीय बुद्धिमत्तेने विक्रमी 14 महिन्यांत 4 जी तंत्रज्ञान विकसित केले, असे त्यांनी सांगितले. 5-जी तंत्रज्ञान विकसित करण्यात भारतीय संस्था आणि शास्त्रज्ञांची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. त्याचबरोबर आपण 6 जी तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे , जेणेकरून आपल्याला 6 जी मध्ये आघाडी घेता येईल आणि संपूर्ण जगाची दिशा ठरवता येईल असे त्यांनी सांगितले.
दूरसंचार , प्रसारण , माहिती आणि तंत्रज्ञान ,विमानतळ पायाभूत सुविधा आणि आधार या क्षेत्रातील हितसंबंधितांमध्ये वादविवादाच्या निराकरणासह नियामक यंत्रणेबाबत जागरूकता वाढवणे हा या परिसंवादाचा उद्देश होता.
S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805565)
Visitor Counter : 286