आदिवासी विकास मंत्रालय

ट्राईब्ज इंडियाकडून होलिकोत्सव विशेष, आकर्षक, विविध प्रकारची आदिवासी उत्पादने उपलब्ध

Posted On: 11 MAR 2022 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2022

देशात वसंतऋतूचा प्रभाव दिसू लागला आहे. वसंताच्या उल्हासी आगमनाबरोबरच होळीच्या रंगबहार सणाची चाहूल लागली आहे. सणाचा उत्साह वातावरणात मिसळू लागला आहे. या सणाचा उल्हास आनंद वृद्धींगत करण्यासाठी ट्राईब्ज इंडियाने आपल्या ग्राहकवर्गासाठी पुन्हा एकदा आकर्षक, अनेकविध आदिवासी उत्पादने आणली आहेत.

या होलिकोत्सवासाठी तयार केलेल्या विविध विणकारीच्या आणि पद्धतीच्या तसेच महेश्वरी, चंदेरी, बाघ, कांथा, भंडारा, टसर, संबळपूरी, पोचमपल्ली आणि इकत अश्या अनेकानेक प्रकारच्या रंगीबेरंगी साड्या, कुर्ते, स्टोल्स, विविध पोशाखांसाठीचे कापड उपलब्ध आहेत.

याशिवाय सेंद्रीय गुलाल, सेंद्रीय साबण व शँपू, सेंद्रीय तेले, सरबते, स्क्वाश, सुकामेवा काजू, विविध प्रकारचे मध अशी अनेक नैसर्गिक वनस्पतीजन्य उत्पादने उपलब्ध आहेत. डोक्रा कारागिरी परंपरेतील हाताने कलाकुसर केलेले वाडगे खास होळीच्या पारंपारीक खाद्यपदार्थांची लज्जतीसह नैसर्गीक रंगसंगतीचा साज लेवून ग्राहकांची वाट बघत आहेत.

सेंद्रीय हळद, सुकवलेला आवळा, रानमध, काळी मिरी, नाचणी, त्रिफळा असे प्रतिकारक्षमता वाढवणारे पदार्थ, मूगडाळ, उडीद डाळ, वाल, दलिया यासारख्या मिश्र डाळीं ते वारली वा पटचित्र पद्धतीची चित्रे, डोक्रा पद्धतीचे दागिने ते ईशान्य भारतातील वांचो आणि कोन्याक आदिवासींमधील माळा ते कठपुतळी बाहुल्या, लहान मुलांसाठीची खेळणी, धातूच्या आणि बांबूपासून बनवलेल्या वस्तू या ट्रायफेडचा भाग आहेत.

ही आदिवासी उत्पादने, हस्तकारी उत्पादने, सेंद्रीय उत्पादने हा भेटवस्तूंना आकर्षक पर्याय आहे. गरजेनुसार व प्रत्येकाच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत भेटवस्तू आकर्षक वेष्टनात मिळतील. भेटवस्तू या ट्राईब्ज इंडियासाठी ख्यातनाम डिझायनर रिना ढाका यांच्या संकल्पनेची निर्मिती असणाऱ्या उच्च दर्जाच्या नैसर्गीक, पुनर्वापरायोग्य, टिकाउ वेष्टनात उपलब्ध आहेत आणि भेटवस्तू म्हणून देण्यास योग्य आहेत.


 


S.Tupe /V.Sahjrao/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1805193) Visitor Counter : 233