पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह स्वामित्व योजनेअंतर्गत खासदार/आमदारांना त्यांच्या मतदारसंघात ड्रोन उड्डाण सुरू करण्याबाबत माहिती देण्यासाठी एसएमएस सेवेचा प्रारंभ करणार


निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे योजनेच्या अंमलबजावणीबाबत जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो

Posted On: 10 MAR 2022 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2022

केंद्रीय पंचायती राज आणि ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह स्वामित्व योजनेअंतर्गत सर्वेक्षणासाठी खासदार/आमदारांना त्यांच्या मतदारसंघात ड्रोन उड्डाण सुरू करण्याबाबत माहिती देण्यासाठी एसएमएस  सेवेचा प्रारंभ करणार  आहेत.  11 मार्च 2022 रोजी पंचायती राज मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST), नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MoCA) भारतीय  सर्वेक्षण  (SoI), नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेन्टर (NIC) च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या सुविधेचा शुभारंभ करणार आहेत.

या नवीन सेवेमुळे  योजनेचा व्यापक प्रसार आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या (ईआर) सहभागाने योजनांच्या अंमलबजावणीबद्दल जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.

स्वामित्व ही  पंचायती राज मंत्रालयाची एक केंद्रीय क्षेत्र योजना 9 राज्यांमध्ये योजनेचा प्रायोगिक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर  राष्ट्रीय पंचायती राज दिनी  24 एप्रिल 2021 रोजी पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्तरावर सुरू केली.  या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील गावातील मालमत्ता धारकांना  'त्यांच्या हक्काचे दस्तावेज प्रदान करणे आणि मालमत्ता कार्ड जारी करणे हा आहे.


S.Patil/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1804928) Visitor Counter : 193


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu