कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरातील शेतकरी पुसा कृषी मेळ्याचा लाभ घेत आहेत


मेळाव्यात सुमारे 12000 शेतकरी सहभागी झाले असून दुसऱ्या दिवशी 1100 क्विंटल पेक्षा जास्त पुसा बियाणांची खरेदी करण्यात आली

चार तांत्रिक सत्रांमध्ये शेतकऱ्यांना स्मार्ट शेती, नैसर्गिक शेती, उच्च उत्पादकता आणि कृषी निर्यात विषयी माहिती देण्यात आली

Posted On: 10 MAR 2022 9:43PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 10 मार्च 2022

भारतीय कृषी संशोधन संस्थेतर्फे आयोजित कृषी विज्ञान मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी देशभरातील हजारो शेतकऱ्यांनी या मेळ्याचा लाभ घेतला. "तांत्रिक ज्ञानासह स्वावलंबी शेतकरी" ही मेळ्याची मुख्य संकल्पना आहे. देशभरातील सुमारे 12000 शेतकरी सहभागी झाले होते आणि शेतकऱ्यांनी 1100 क्विंटल पेक्षा जास्त पुसा बियाणे खरेदी केली. मेळ्याच्या दुसऱ्या दिवशी 4 तांत्रिक सत्रे झाली. चार तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना स्मार्ट शेती; नैसर्गिक शेती; उच्च उत्पादकतेसाठी हायड्रोपोनिक आणि एरोपोनिक शेती; आणि समृद्धीसाठी कृषी निर्यात बाबत माहिती देण्यात आली.

बासमती तांदळाच्या तीन जातींची  बियाणे; पुसा बासमती 1847, पुसा बासमती 1885, पुसा बासमती 1886 या नवीन वाणांचे बियाणे शेतकऱ्यांना स्वत: तयार करता यावे यासाठी मेळ्यात शेतकऱ्यांना वितरित  करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी नवीन पिकांच्या वाणांचे थेट प्रात्यक्षिक, भाजीपाला, फुलांच्या संरक्षित लागवडीचे प्रात्यक्षिक आणि संस्था व खाजगी कंपन्यांनी विकसित केलेल्या कृषी अवजारांचे प्रदर्शन व विक्री यामध्ये स्वारस्य दाखवले. सुधारित जातीचे बियाणे व रोपांची विक्री झाल्यामुळे  शेतकरी सुखावला. याशिवाय कृषी उत्पादने आणि कृषी रसायनांचे प्रदर्शन व विक्री, कल्पक शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री सर्वांना आकर्षित करत होती.

100 हून अधिक आयसीएआर  संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि इतर संस्था 225 स्टॉल्सद्वारे प्रगत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करत आहेत. पहिल्या दिवशी, देशातील विविध विभागातील 12000-15000 शेतकऱ्यांनी मेळ्यात भाग घेतला आणि नवी दिल्लीच्या विविध विभागांनी विकसित केलेली वाणे आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली, तसेच प्रत्यक्ष प्रदर्शन, विविध कृषी मॉडेल्स आणि शेतकरी सल्लागार सेवांचा देखील लाभ घेतला.


 
S.Patil/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1804927) Visitor Counter : 267


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu