ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक ब्युरोने 'बीआयएस प्रमाणीकरण प्राध्यापक ' पदासाठी आयआयटी रुरकीसोबत केला सामंजस्य करार
प्रमाणीकरण आणि अनुरूपता मूल्यमापन क्षेत्रात संशोधन आणि विकास, शिक्षण आणि प्रशिक्षण सुलभ करण्यासाठी हा सामंजस्य करार
Posted On:
10 MAR 2022 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली : 10 मार्च 2022
भारतीय मानक ब्युरोने (BIS), आयआयटी रुरकी (IITR) सोबत 10 मार्च 2022 रोजी आयआयटी रुरकीमध्ये 'बीआयएस प्रमाणीकरण प्राध्यापक ' पद सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. प्रमाणीकरण आणि अनुरूपता मूल्यमापन या संदर्भातील क्रियाकलापांसाठी बीआयएसद्वारे एखाद्या संस्थेमध्ये सुरू करण्यात आलेले हे पहिले प्रमाणीकरण अध्यासनपद आहे .
या सामंजस्य करारामुळे नागरी, विद्युत ,यांत्रिकी , रसायने , भूकंप अभियांत्रिकी, जलस्रोतांचा विकास व व्यवस्थापन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प,पायाभूत सुविधा,वैद्यकीय जैवतंत्रज्ञान आणि नॅनोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान, बायोमटेरिअल्स, इत्यादी क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून देशातील प्रमाणीकरण आणि अनुरूपता मूल्यमापन क्षेत्रात संशोधन आणि विकास, शिक्षण आणि प्रशिक्षण सुलभ होईल. यामुळे मानके नवोन्मेषाला कशाप्रकारे प्रोत्साहन आणि सुविधा देऊ शकतात याबाबत विद्यार्थ्यांना अवगत करता येईल आणि त्यांच्या भविष्यातील व्यावसायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे सज्ज होतील.
या उपक्रमाला सर्वतोपरी साहाय्य करण्याची ग्वाही बीआयएसचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी यावेळी दिली.
S.Patil/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804912)
Visitor Counter : 248