ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
सोया उत्पादन उत्पादकांना मानक चिन्ह (ISI मार्क) वापरण्यासाठी भारतीय मानक विभागाचे प्रमाणपत्र घेण्यास प्रोत्साहन
भारतीय मानक विभागाकडून सोया उत्पादनांसाठी सात भारतीय मानके प्रकाशित
Posted On:
10 MAR 2022 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली : 10 मार्च 2022
बीआयएस अर्थात भारतीय मानक विभागाने 9 मार्च 2022 रोजी 'सोया उत्पादनांवरील भारतीय मानके' या विषयावर जागरूकता आणि अंमलबजावणी वेबिनारचे आयोजन केले होते. सामान्य लोकांमध्ये वाढत्या आरोग्यविषयक जागरूकतेमुळे, सोयाबीनच्या वापराला टेक्सचर्ड व्हेजिटेबल प्रोटीन, (सोया वडी किंवा सोया नगेट्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या) सोया दूध, टोफू, सोया दही इ. स्वरूपात मान्यता मिळत आहे.
या सोया उत्पादनांची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी, भौतिक, रासायनिक आणि सूक्ष्मजीवशास्त्रीय मापदंड आणि त्यांच्या चाचणी पद्धती प्रमाणित केल्या जातात. सोया उत्पादनांवरील भारतीय मानकांची अंमलबजावणी आणि प्रमाणीकरण सोया उत्पादनांचा भारतीय आहारात समावेश करण्यात मदत करेल. अशाप्रकारे, सोया उत्पादनांचा दर्जा आणि सुरक्षितता वाढल्याने उत्पादकाला चांगला भाव मिळून फायदा होईल आणि ग्राहकांना एकूणच सार्वजनिक आरोग्य सुधारणारी सुरक्षित उत्पादने मिळतील.
वेबिनारमध्ये सूक्ष्म आणि मध्यम उद्योगातील 50 हून अधिक जण सहभागी झाले होते. विहित केलेल्या महत्त्वपूर्ण आवश्यकतांवर प्रकाश टाकत सोया उत्पादनांवरील वर्तमान भारतीय मानके आणि व्यवस्थेमधील नवीन मानकांशी संबंधित माहिती सामायिक केली गेली. उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांवर प्रमाणित चिन्ह (ISI मार्क) वापरण्यासाठी बीआयएस प्रमाणपत्र घेण्यास प्रोत्साहन देण्यात आले. बीआयएस अनुरूप मूल्यमापन योजना आणि परवाना अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल माहिती देखील प्रदान करण्यात आली. बीआयएसने सोया उत्पादनांसाठी सात भारतीय मानके प्रकाशित केली आहेत.
भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ यांच्या विनंती नुसार भारतीय मानक विभाग नवीन सोया उत्पादनांसाठी नवीन भारतीय मानके विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. लोकांकडून मते जाणून घेताना सहभागींना मसुदा मानकांवर टिप्पणी करण्यास प्रोत्साहित केले गेले.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804907)
Visitor Counter : 235