संरक्षण मंत्रालय

ऑस्ट्रेलियाच्या लष्करप्रमुखांनी लोंगेवाला इथे दिली भेट, पोखरण येथे एकात्मिक अग्निशक्ती प्रात्यक्षिकाचे साक्षीदार

Posted On: 10 MAR 2022 7:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली : 10 मार्च 2022

ऑस्ट्रेलियाचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल रिचर्ड मॅक्सवेल बर  AO, DSC, MVO,  08 मार्च 2022 पासून भारताच्या चार दिवसांच्या  दौऱ्यावर आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या लष्करप्रमुखांनी आज 10 मार्च 2022 रोजी,  राजस्थानमधील जोधपूर, पोखरण आणि  लोंगेवाला इथल्या स्थळांना  भेट दिली. ऑस्ट्रेलियाच्या लष्करप्रमुखांचे लोंगेवाला  येथे आगमन झाल्यावर,  लेफ्टनंट जनरल राकेश कपूर, जीओसी, डेझर्ट कॉर्प्स यांनी त्यांचे स्वागत केले.  त्यानंतर त्यांनी, 1971 च्या भारत-पाकिस्तान  युद्धात शहीद झालेल्या भारतीय  वीरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या युद्ध स्मारकावर  आदरांजली वाहिली.  भारतीय सैनिकांच्या मूल्यांचा आणि शौर्याचा साक्षीदार असलेली  'युद्ध स्मारके' उभारणे  आणि त्यांची देखभाल करणे आणि सामान्य लोकांपर्यंत ती पोहोचवण्यासाठी भारतीय लष्कर करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
लेफ्टनंट जनरल रिचर्ड बर  यांनी पोखरण फील्ड फायरिंग रेंजलादेखील भेट दिली. तिथे त्यांनी  शस्त्रास्त्र, तोफखाना, पायदळ आणि विमानचालन मालमत्तेचा समावेश असलेले लष्करी संचलन पहिले.  ऑस्ट्र्रेलियाच्या लष्करप्रमुखांनी  भारतीय सैनिकाच्या खंबीरपणाची आणि विविध भूप्रदेशात व  कठीण परिस्थितीत काम करण्याच्या त्याच्या क्षमतेची प्रशंसा केली.


 
S.Patil/S.Kulkarni/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1804878) Visitor Counter : 159


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil