सांस्कृतिक मंत्रालय
संस्कृती मंत्रालयाच्या साहित्य अकादमीद्वारे नवी दिल्ली येथे 10 ते 15 मार्च 2022 या कालावधीत ‘साहित्योत्सव’ या साहित्य महोत्सवाचे आयोजन
24 पुरस्कार विजेत्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येणार
Posted On:
09 MAR 2022 7:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2022
नवी दिल्ली येथे 10 ते 15 मार्च 2022 या कालावधीत 'साहित्योत्सव ' हा साहित्य अकादमीचा भारतातील सर्वसमावेशक साहित्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा फेस्टिव्हल ऑफ लेटर्स 2022 हा एक भाग असेल. या कार्यक्रमाचा विषय स्वातंत्र्य किंवा स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित असेल. महोत्सवात, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित पुस्तके आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी संबंधित इतर साहित्य देखील पहायला मिळेल.
सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते 10 मार्च 2022 रोजी अकादमीच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाने महोत्सवाची सुरुवात होईल. या प्रदर्शनात अकादमीची कामगिरी तसेच मागील वर्षात झालेल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांबाबत माहिती मिळेल.
11 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रवींद्र भवन लॉन्स येथे 24 आदिवासी भाषांचे प्रतिनिधित्व करणारे "आदिवासी लेखक संमेलन" आयोजित करण्यात आले आहे.
11 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजता 24 पुरस्कार विजेत्यांना प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान केले जातील आणि कोपर्निकस मार्गावरील कमानी सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ होईल. प्रख्यात मराठी साहित्यिक आणि समीक्षक डॉ.भालचंद्र नेमाडे पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर कंबार पुरस्कार प्रदान करतील.
सर्व 24 पुरस्कार विजेते 12 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रवींद्र भवन लॉन्स येथे "लेखक संमेलनासाठी" एकत्र जमतील आणि पुरस्कार प्राप्त पुस्तके लिहितानाची सर्जनशील प्रक्रिया सामायिक करतील.
13 मार्च 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता अकादमी सभागृहात "भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर साहित्याचा प्रभाव" या विषयावर 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला (13 - 15 मार्च) सुरूवात होईल, प्रख्यात हिंदी लेखक आणि साहित्य अकादमीचे सभासद डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी त्याचे उद्घाटन करतील. तर प्रख्यात अभ्यासक डॉ हरीश त्रिवेदी हे बीजभाषण करतील. देशभरातील 42 नामवंत विचारवंत यात सहभागी होतील आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर साहित्याच्या प्रभावाच्या विविध पैलूंवर सादरीकरण करतील.
त्याच दिवशी, 14 मार्च 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता "1947 पासून भारतीय भाषांमधील काल्पनिक आणि विज्ञान कथा" या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन केले जाईल. आकाशवाणीचे महासंचालक वेणुधर रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन होईल, प्रख्यात मराठी लेखक विश्वास पाटील अध्यक्षस्थानी असतील आणि दैनिक जागरणचे साहित्यिक संपादक राजेंद्र राव हे सन्माननीय अतिथी असतील. त्याच दिवशी, साहित्य अकादमीच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2.30 "तृतीयपंथीय कवींचे संमेलन होईल आणि प्रख्यात गुजराती कवी डॉ. विनोद जोशी हे सन्माननीय अतिथी असतील.
15 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता “पुर्वोत्तरी" हा ईशान्य प्रदेश आणि उत्तरेकडील लेखकांचे संमेलन होईल. अकादमीचे पुस्तक प्रदर्शन महोत्सवाच्या सर्व दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले असेल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804499)
Visitor Counter : 331