वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बांगलादेश बरोबरच्या सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराला (CEPA) भारत प्रगतीपथावर नेऊ इच्छितो – पियुष गोयल

प्रविष्टि तिथि: 07 MAR 2022 10:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मार्च 2022

 

बांगलादेश बरोबरच्या सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराला (CEPA) भारत प्रगतीपथावर नेऊ इच्छितो, असे  केंद्रीय वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. भारतीय चेंबर ऑफ कॉमर्स ने आयोजित केलेल्या ‘भारत बांगलादेश हितधारक बैठकी’च्या उदघाटन सत्रात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांगलादेशच्या  पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रयत्नांमुळे भारत बांगलादेश द्विपक्षीय संबंध नव्या शिखरावर पोहोचल्याचे  गोयल यांनी सांगितले.

उभय देशातली मैत्री आता एकमेकांना समृद्ध करणाऱ्या बहुआयामी संबंधांमध्ये परिवर्तित झाली असून व्यापार, गुंतवणूक, अन्न सुरक्षा आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांमध्ये एकमेकांना  सहकार्य मिळत असल्याचे गोयल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे भाषण करताना सांगितले. भारत बांगलादेश संबंध दृढ करण्यासाठी चार प्रमुख क्षेत्रांचा यावेळी गोयल यांनी उल्लेख केला.

बांगलादेश हा भारताच्या व्यापारात दक्षिण आशियातील सर्वात मोठा भागीदार असल्याचे गोयल म्हणाले. या हितधारकांच्या बैठकीमुळे केवळ बांगलादेशच नव्हे तर दक्षिण पूर्व आशियातील इतर अनेक देशांशी भारताच्या  व्यापारी संबंधाना प्रोत्साहन मिळेल अशी आशा यावेळी गोयल यांनी व्यक्त केली.

 

* * *

N.Chitale/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1803755) आगंतुक पटल : 259
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Telugu