वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
फेब्रुवारी 2022 मध्ये भारताच्या व्यापारी मालाच्या निर्यातीत फेब्रुवारी 2021च्या तुलनेत 22.36% वाढ, फेब्रुवारी 2022 मध्ये निर्यात 33.81 अब्ज डॉलर्सवर
Posted On:
02 MAR 2022 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2022
भारताच्या व्यापारी मालाची निर्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 33.81 अब्ज डॉलर्स मुल्याइतकी नोंदवण्यात आली. या निर्यातीत, फेब्रुवारी 2021 मधील 27.63 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 22.36% आणि फेब्रुवारी 2020 मधील 27.74 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत निर्यातीत 21.88% वाढ झाली आहे.
एप्रिल 2021-फेब्रुवारी 2022 या कालावधी दरम्यान भारताची व्यापारी मालाची निर्यात 374.05 अब्ज डॉलर्स होती, या निर्यातीत, एप्रिल 2020-फेब्रुवारी 2021 या कालावधीतील 256.55 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 45.80% आणि एप्रिल 2019-फेब्रुवारी 2020 या कालावधीमधील 291.87 अब्ज डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत 28.16% वाढ झाली आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये भारताची व्यापारी मालाची आयात 55.01 अब्ज डॉलर्स होती, या आयातीत , फेब्रुवारी 2021 मधील 40.75 अब्ज डॉलर्स आयातीच्या तुलनेत 34.99% आणि फेब्रुवारी 2020 मधील 37.90 अब्ज डॉलर्स आयातीच्या तुलनेत 45.12% वाढ झाली आहे.
एप्रिल 2021-फेब्रुवारी 2022 या कालावधीत भारताची व्यापारी मालाची आयात 550.12 अब्ज डॉलर्स नोंदवण्यात आली, या आयातीत , एप्रिल 2020-फेब्रुवारी 2021 या कालावधीतील 345.54 अब्ज डॉलर्स आयातीच्या तुलनेत 59.21% आणि एप्रिल 2019-फेब्रुवारी 2020 मधील 443.24 अब्ज डॉलर्स आयातीच्या तुलनेत 24.11% वाढ नोंदवण्यात आली.
फेब्रुवारी 2022 मध्ये व्यापारी तूट 21.19 अब्ज डॉलर्स इतकी राहिली तर एप्रिल 2021-फेब्रुवारी 2022 या कालावधीत व्यापारी तूट 176.07 अब्ज डॉलर्स होती.
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1802458)
Visitor Counter : 241