उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला सुरक्षित मायदेशी आणले जाईल असा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला विश्वास


सर्व देशांबरोबर शांततापूर्ण सहअस्तित्वावर भारताचा सदैव विश्वास

Posted On: 02 MAR 2022 5:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मार्च 2022

 

युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला सुरक्षित मायदेशी आणले जाईल, असा विश्वास उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आज व्यक्त केला.  भारत सरकारचे या दिशेने सर्वंकष प्रयत्न सुरु  असल्याचे ते म्हणाले.

विल ड्युरांट लिखित “अ केस फॉर इंडिया” या पुस्तकाच्या  तेलुगूमधील “भारत देस पक्षना”  या अनुवादाच्या प्रकाशन समारंभात ते आज विजयवाडा इथे बोलत होते. युद्धक्षेत्रात अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांची सर्व माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आपल्याला दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने केवळ देशहिताला समोर ठेवून आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण भूमिका स्वीकारली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व नागरिकांनी देशहिताचा विचार करून मगच आपले विचार मांडावेत व भारताचे नुकसान होईल अशा पद्धतीचे मतप्रदर्शन  करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सामर्थ्यशाली देश बनण्याकडे भारताची घोडदौड सुरु असून हे ज्यांना सहन होत नाही, असा  आंतरराष्ट्रीय माध्यमामधला एक वर्ग, योग्य माहिती लपवून खोटी माहिती पसरवण्याची मोहीम चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. 

भारताने नेहमीच सर्व देशांशी शांततापूर्ण सहअस्तित्वावर भर दिला असल्याचे ते म्हणाले.

 
* * *

N.Chitale/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1802350) अभ्यागत कक्ष : 245