पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रेन्च गणराज्याचे अध्यक्ष म. म. इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण
Posted On:
01 MAR 2022 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मार्च 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रेन्च गणराज्याचे अध्यक्ष म. म. इमॅन्युएल मॅक्रोन यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले.
युक्रेनमधील सद्यःपरिस्थितीवर या दोन नेत्यांनी चर्चा केली. युक्रेनमधील हिंसाचार व बिघडत चाललेली मानवतावादाची परिस्थिती यावर त्यांनी आपापली मते प्रदर्शित केली.
हिंसाचार थांबवणे आणि राजकीय पद्धतीने व चर्चेद्वारे या समस्येवर उपाय शोधण्याच्या आपल्या आवाहनाचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला. सध्याच्या आधुनिक जगात आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव, सर्व देशांची प्रादेशिक एकात्मता व सार्वभौमत्व या सर्व तत्वांवर भारताचा संपूर्ण विश्वास असल्याचे यावेळी मोदी यांनी नमूद केले.
या द्विपक्षीय चर्चेचे मोदी यांनी स्वागत केले. सर्व नागरिकांचा विनाअडथळा प्रवास आणि मुक्त व मानवतावादी संचार सुनिश्चित करणे, यावर त्यांनी भर दिला.
अशांत भागांमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या, तसेच जखमींसाठी तातडीचा वैद्यकीय पुरवठा करण्याच्या भारताच्या प्रयत्नांची माहिती मोदी यांनी अध्यक्ष मॅक्रोन यांना दिली.
* * *
Jaydevi PS/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1802315)
Visitor Counter : 213
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam