भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन

Posted On: 28 FEB 2022 11:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2022

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) आणि भूविज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 च्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालयाचे एका उच्चस्तरीय आभासी कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्घाटन केले.

आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय(आयएमपीओ) भूविज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या पुण्याच्या भारतीय कटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये सुरुवातीला पाच वर्षांसाठी स्थापित होणार आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी असलेले मान्सूनचे महत्त्व आयएमपीओच्या स्थापनेमुळे अधोरेखित होत आहे. यामुळे जागतिक दीर्घकालीन हवामान संशोधन कार्यक्रम आणि जागतिक दैनंदिन हवामान संशोधन कार्यक्रमांतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मान्सून संशोधनाशी संबंधित उपक्रम आणि इतर कार्यक्रम यांना समाविष्ट करण्यात येईल. हे दोन्ही कार्यक्रम  संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या समन्वयाने चालवले जाणारे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहेत.

भारतात आयएमपीओ स्थापन झाल्यामुळे मान्सूनच्या हंगामी परिवर्तनशीलतेचा अभ्यास करण्यासाठी एकात्मिक वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विस्तार होईल. तसेच मान्सून आणि चक्रीवादळे यांचे भाकित करण्याच्या कौशल्यात वाढ , मान्सून संशोधनाला अधिक चांगल्या प्रकारे बळकटी देता येईल आणि कृषी, जल संपदा आणि आपत्ती व्यवस्थापन, जलशक्ती आणि हवामानावर अवलंबून असलेली सामाजिक आर्थिक क्षेत्रे यांसाठी महत्त्वाची असलेली क्षमतावृद्धी आणि ज्ञानाची देवाणघेवाणही शक्य होईल.

 

* * *

R.Aghor/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1801946) Visitor Counter : 329


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali