संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिमी नौदल कमांडच्या वतीने थिएटर कमांडविषयी उच्चस्तरीय बैठक

Posted On: 25 FEB 2022 10:00PM by PIB Mumbai

 

पश्चिमी नौदल कमांडच्या नेतृत्वाखाली भारतीय सशस्त्र दलांसाठी एकात्मिक थिएटर कमांडर्सच्या निर्मितीसाठी कार्यपद्धती आणि संरचनात्मक आराखडा तयार करण्यासाठी चर्चा झाली. ही बैठक म्हणजे सैन्यदलांच्या तिन्ही सेवांचे संयुक्तपणाने कार्य केले जावे आणि त्यांच्यामध्ये संघटनात्मक समन्वय वाढविण्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

या उच्चस्तरीय बैठकीमध्ये भारतीय लष्कर, नौदल, हवाईदल आणि एएनसी यांचे एकूण नऊ कमांडर-इन-चीफ उपस्थित होते. याप्रसंगी  एकात्मिक सागरी थिएटर कमांडच्या स्थापनेसंबंधीच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी) होते. यासंबंधीच्या अभ्यासासाठी प्रमुख म्हणून सीइनसीम्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

कमांडर इन चीफ यांच्याशिवाय तिन्ही सेवांच्या विविध कमांडर्सचे वरिष्ठ अधिकारी, तसेच मुख्यालयातले अधिकारी, एकात्मिक संरक्षण कर्मचारी आणि लष्करी व्यवहार विभागातले जवळपास 50 वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी थिएटर कमांडचा पाया भक्कम रचण्यात यावा, यासाठी विविध शिफारसी केल्या. 24 आणि 25 फेब्रुवारी 2022 असे दोन दिवस या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

***

R.Aghor/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801219) Visitor Counter : 301


Read this release in: English , Urdu , Hindi