अर्थ मंत्रालय

केंद्र सरकारच्या सरकारी  रोख्यांचे लिलाव करण्यासाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर


(आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीतील उर्वरित काळासाठी)

Posted On: 25 FEB 2022 9:10PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारने आपल्याजवळील रोख स्थितीचा आढावा घेतल्यानंतर, केंद्र सरकारने भारतीय रिजर्व बॅंकेशी सल्लामसलत करुन, सरकारी रोख्यांचे लिलाव करण्यासाठी सुधारित तारीख आणि रक्कम जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीच्या उर्वरित वर्षासाठी हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

Notified Amount for Auction of Treasury Bills

(March 02, 2022 to – March 31, 2022)

(Rs Crore)

Date of Auction

91 Days

182 Days

364 Days

Total

March 02, 2022

7,000

15,000

16,000

38,000

March 09, 2022

7,000

15,000

15,000

37,000

March 16, 2022

7,000

15,000

15,000

37,000

March 23, 2022

7,000

15,000

15,000

37,000

March 30, 2022

7,000

15,000

15,000

37,000

Total

35,000

75,000

76,000

1,86,000

 

केंद्र सरकार, रिजर्व बँकेशी सल्लामसलत करुन पुढेही गरजेनुसार सरकारी रोख्यांचे लिलाव करण्याचे सुधारित वेळापत्रक वेळोवेळी जाहीर करत राहणार आहे, केंद्र सरकारच्या गरजा, बदलत्या बाजारपेठेच्या स्थिती आणि इतर संबंधित घटकांचा विचार करुन बाजारात पुरेशी पूर्वसूचना देऊन, हे वेळापत्रक जाहीर केले जाईल. म्हणजेच, जर परिस्थिती बदलली तर या वेळापत्रकात आणखी बदल होऊ शकतो. हे बदल प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले जातील.

***

R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801212) Visitor Counter : 178


Read this release in: English , Urdu , Hindi