सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी युनियन बँकेच्या एमएसएमई रूपे कार्डची सुरुवात केली

Posted On: 25 FEB 2022 6:15PM by PIB Mumbai

 

मुंबई 25 फेब्रुवारी 2022

केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज 25 फेब्रुवारी 2022 रोजी सिंधुदुर्ग येथे युनियन बँकेच्या एमएसएमई रूपे कार्डची सुरुवात केली. केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने सिंधुदुर्ग येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय एमएसएमई परिषदेमध्ये हा कार्यक्रम झाला. भारतीय राष्ट्रीय भरणा महामंडळाच्या सहकार्याने भारतीय युनियन बँकेतर्फे हे कार्ड वितरीत केले जाणार आहे. या कार्डाच्या माध्यमातून एमएसएमई उद्योगांना त्यांच्या व्यापाराशी संबंधित परिचालन खर्चासाठी सोप्या पद्धतीने पैसे मिळण्याची यंत्रणा उपलब्ध करून देत आहे.

हे रूपे क्रेडीट कार्ड  घेणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही वेळी पैशाचा डिजिटल स्वरुपात भरणा करणे तसेच बिनव्याजी कालावधी अशा सुविधांचा लाभ मिळेल आणि या कार्डाला कर्जावर असलेल्या व्याजदराइतकेच व्याज लावले जाईल. एमएसएमई कर्जदारांना त्यांच्या व्यापारासाठी केलेल्या खर्चाच्या परतफेडीसाठी 50 दिवसांपर्यंत बिनव्याजी कर्ज सवलतीचा लाभ मिळेल. तसेच या कार्डाच्या ग्राहकांना त्यांच्या व्यापाराशी संबंधित खरेदीचा खर्च अदा करण्यासाठी ईएमआय सुविधा देखील देण्यात आली आहे. तसेच एमएसएमई उद्योगांना त्यांचा व्यापार बहुतांश डिजिटल मंचांपर्यंत पोहोचविण्यात मदत करण्यासाठी या कार्डाद्वारे विशेष उपयुक्त ठरणाऱ्या कार्याक्षण व्यापार विषयक सेवा पुरविण्यात आल्या आहेत.

या कार्डाच्या इतर लाभांमध्ये अपघात विमा, लाउंज प्रवेश आणि रूपे कार्डवर भारतीय राष्ट्रीय भरणा महामंडळातर्फे देय असलेले इतर लाभ समाविष्ट आहेत. त्याशिवाय, या कार्डद्वारे एमएसएमई उद्योगांना विविध अतरिक्त सोयी आणि व्यापार विषयक सेवा पुरविण्यात आल्या आहेत.

या परिषदेदरम्यान, केंद्रीय एमएसएमई मंत्र्यांनी उपस्थित एमएसएमई उद्योजकांना एमएसएमई रुपे कार्डाच्या पहिल्या संचातील कार्डांचे वितरण देखील केले..

 

हे देखील वाचा

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सिधुदुर्ग येथे एमएसएमई-तंत्रज्ञान केंद्राच्या स्थापनेची केली घोषणा

***

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801136) Visitor Counter : 289


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu