संरक्षण मंत्रालय
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड-एचएएलच्या तिसऱ्या उच्चस्तरीय बैठकीत, भारतीय नौदल आणि एचएएल यांच्यात परस्पर हितसंबंध विषयक करारावर स्वाक्षऱ्या
Posted On:
25 FEB 2022 4:52PM by PIB Mumbai
भारतीय नौदल आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड -एचएएल यांच्यात व्यवहाराविषयीच्या परस्पर हितसंबंधाच्या प्राथमिक बोलणी विषयक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दि. 24 फेब्रुवारी, 2022 रोजी नेव्हल इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल टेक्नॉलॉजी, कोची आणि एचएएल व्यवस्थापन अकादमी, बंगलुरू यांच्यामध्ये ‘फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्रॅम अधिक सुलभ करण्यासाठी परस्पर हितसंबंध विषयक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या सामंजस्य कराराचा उद्देश, परस्परांमधील सहकार्यातून प्रशिक्षणार्थींसाठी कौशल्य संचांचा विकास करणे अधिक सुलभ होणार आहे. यामध्ये अल्पमुदतीचे, दीर्घ मुदतीचे तसेच ‘कॅप्सूल’ अभ्यासक्रम, अतिथींची व्याख्याने, कार्यशाळा आणि परिषदांचे आयोजन करून त्यांना अत्याधुनिक विमान वाहतूक तंत्रज्ञान आणि देखभाल, दुरूस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ), व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी या ‘म्युच्युअल एक्सप्रेशन ऑफ इंटरसेस्ट’वर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. या सामंजस्य व्यवस्था करारावर आरएडीएम व्हीएसएम, असिस्टंट चीफ ऑफ नेवल स्टाफ (एअर मटेरिअल) दीपक बन्सल आणि महा व्यवस्थापक तसेच एचएएलच्या व्यवस्थापन अकादमीचे प्रमुख डॉ. जी श्रीकांत शर्मा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. हा करार भारतीय नौदल आणि एचएएलच्या सर्वोच्च स्तरीय तिस-या बैठकीमध्ये झाला. याप्रसंगी व्हीए डीएम रवनीत सिंग (पीव्हएसएम, एव्हीएसएम, एनएम), नौदल उपप्रमुख आणि एचएएलचे संचालक (ऑपरेशन्स) एम एस वेलपारी, उपस्थित होते. या परस्पर हितसंबंधविषयक कराराचा दोन्ही संस्थांचे कर्मचारी, प्रशिक्षणार्थी यांना मोठा लाभ होणार आहे.
***
R.Aghor/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1801103)
Visitor Counter : 204