भारतीय स्पर्धा आयोग
भारतीय स्पर्धा आयोगाने किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड द्वारे आयएसएमटी लिमिटेडमधील हिस्सा संपादनासह प्रस्तावित संयोजनाला मंजुरी दिली
प्रविष्टि तिथि:
24 FEB 2022 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2022
भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड द्वारे आयएसएमटी लिमिटेडमधील हिस्सा संपादनासह प्रस्तावित संयोजनाला मंजुरी दिली आहे.
किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड ही समभाग द्वारे मर्यादित सूचीबद्ध सार्वजनिक कंपनी आणि किर्लोस्कर समूहाची प्रमुख कंपनी आहे. ही कंपनी सध्या पिग आयर्न आणि ग्रे आयर्न कास्टिंग्ज उदा. सिलिंडर ब्लॉक्स, सिलेंडर हेड्स आणि ट्रान्समिशन पार्ट्सची निर्मिती आणि ऑटोमोबाईल, ट्रॅक्टर आणि डिझेल इंजिन उद्योगांना आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या उत्पादन व्यवसायात सक्रिय आहे.
आयएसएमटी लिमिटेड ही मर्यादित समभागासह सूचीबद्ध सार्वजनिक कंपनी आहे. स्टील, सीमलेस ट्यूब्स आणि पाईप्स आणि अशा ट्यूब्समधील अनेक मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीच्या व्यवसायात सक्रिय आहे ज्यामध्ये बेअरिंग रिंग, गियर ब्लँक्स, थ्रेडेड आणि कपल्ड केसिंगचा समावेश आहे.
प्रस्तावित संयोजनाच्या माध्यमातून, अधिग्रहणकर्ता (i) प्राधान्य वाटपाच्या मार्गाने नोंदणी आणि (ii) सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (शेअर्स आणि अधिग्रहण संपादन) नियमन कायदा, 2011 नुसार, उद्दिष्टाच्या वोटिंग कॅपिटलच्या 25.05% पर्यंत संपादन करण्याची खुली ऑफर देऊन एकहाती नियंत्रण प्राप्त करण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रस्तावित संयोजनाद्वारे, अधिग्रहणकर्ताचा उद्दिष्टाच्या इमर्जिंग व्होटिंग कॅपिटल (ओपन ऑफर दस्तऐवजांमध्ये परिभाषित केल्यानुसार) 51.25% पर्यंत संपादित करण्याचा प्रयत्न असून इमर्जिंग व्होटिंग कॅपिटलच्या 76.3% (खुल्या ऑफरमध्ये पूर्ण स्वीकृती झाल्यास) संपादित करेल.
स्पर्धा आयोगाचा विस्तृत आदेश लवकरच जारी केला जाईल.
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1800892)
आगंतुक पटल : 228