अल्पसंख्यांक मंत्रालय

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या कार्यवाहक अध्यक्ष सैयद शहजादी यांनी नवी दिल्लीत पूर्ण आयोगाची घेतली बैठक

Posted On: 23 FEB 2022 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 फेब्रुवारी 2022

 

अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिनांक 02 फेब्रुवारी 2022 रोजी  कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यानंतर, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या (NCM) सैयद शहजादी यांनी, आज प्रथमच आपल्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे पूर्ण आयोगाची बैठक घेतली. आयोगाचे बौद्ध, जैन आणि पारसी समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य देखील या बैठकीत उपस्थित होते. आयोगाने एनसीएमशी संबंधित विविध प्रमुख मुद्द्यांवर तसेच अल्पसंख्याकांच्या कल्याणावर चर्चा केली.

2021-22 या वर्षात आयोगाला आजपर्यंत 1850 याचिका प्राप्त झाल्या असून त्यापैकी 1066 चा निपटारा करण्यात आला आहे. 514 प्रकरणांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला असून, उर्वरित 270 प्रकरणांसंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. देशातील अल्पसंख्याकांच्या विविध समस्या आणि हक्कांशी संबंधित निराकरण न झालेल्या प्रकरणांवर आयोग सुनावणी घेत राहील आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य कारवाई करण्याची शिफारस करेल.

 

* * *

N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1800641) Visitor Counter : 583