ग्रामीण विकास मंत्रालय

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ग्रामीण संपर्क व्यवस्थेसंबंधी जीआयएस डेटा प्रसिद्ध केला


या आकडेवारीमुळे उद्योजकांसाठी संधींची नवीन दारे खुली होतील- ग्रामविकास मंत्री

Posted On: 22 FEB 2022 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2022


केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री  गिरीराज सिंह यांनी आज   ग्रामीण संपर्क व्यवस्थेसंबंधी जीआयएस  डेटा प्रसिद्ध केला. यामध्ये पॉइंट्स म्हणून 800,000+ ग्रामीण सुविधा, 1 दशलक्ष+ वस्त्या आणि 25,00,000+ किमी ग्रामीण रस्ते संबंधी जीआयएस आकडेवारी समाविष्ट आहे .  पीएमजीएसवाय योजनेसाठी विकसित जीआयएस  प्लॅटफॉर्म वापरून ही माहिती संकलित आणि डिजिटाईज केली आहे. यावेळी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री  फग्गन सिंग कुलस्ते आणि साध्वी निरंजन ज्योती हे देखील उपस्थित होते.

पीएमजीएसवाय योजनेची नोडल अंमलबजावणी संस्था एनआरआयडीएने 3 प्रसिद्ध जीआयएस कंपन्या ESRI India, MapmyIndia, DataMeet सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आणि ग्रामीण कनेक्टिव्हिटी जीआयएस  डेटा प्रसिद्ध करण्यासाठी गती शक्ती सोबत सहकार्य केले.

गिरीराज सिंह यांनी आठवण करून दिली की पीएमजीएसवाय योजनेच्या सुरुवातीपासून, 2.69 लाख कोटी खर्च करून 1,61,508 वस्त्याना  जोडणारे 6.90 लाख किमी पेक्षा जास्त रस्ते बांधण्यात आले  आहेत.  त्यांनी  माहिती दिली की सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध  डेटा स्टार्टअप्स, उद्योजक, व्यवसाय, नागरी समाज, शैक्षणिक आणि इतर सरकारी विभागांना उत्पादन निर्मिती , संशोधन , गुंतवणुकीचे नियोजन , सेवा वितरणात सुधारणा  आणि आपत्तीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

पीएमजीएसवाय ग्रामीण  कनेक्टिव्हिटी डेटासेट (पीआरसीडी) डाउनलोड करण्यासाठी लिंक:

https://geosadak-pmgsy.nic.in/OpenData

हा डेटा भारत सरकारच्या ओपन डेटा लायसन्स अंतर्गत जारी करण्यात आला आहे आणि सार्वजनिक वापरासाठी विनामूल्य उपलब्ध आहे.

 

पार्श्वभूमी

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) सन 2000 मध्ये सुरू करण्यात आली होती, ज्याचा उद्देश संपूर्ण देशामध्ये संपर्क रहित वस्त्यांना सर्व प्रकारच्या हवामानात अनुकूल रस्ते जोडणी प्रदान करणे हा आहे. त्यानंतर, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने मार्ग आणि प्रमुख ग्रामीण जोडरस्त्यांचे उन्नतीकरण आणि एकत्रीकरण देखील समाविष्ट करण्यात आले.  स्थापनेपासून, 7.83 लाख किमी रस्ते मंजूर करण्यात आले आहेत आणि 2.69 लाख कोटी रुपये खर्च करून 6.90 लाख  किमी रस्ते बांधण्यात आले आहेत.

गती शक्ती हा  लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा विस्तारण्यासाठी भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन आणि डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दोन्ही योजनांचे उत्तम नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी डेटाचे आदानप्रदान  करण्याच्या उद्देशाने एनआरआयडीए गती शक्तीसोबत सहकार्य  करत आहे.


* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1800413) Visitor Counter : 169


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi