विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
प्राध्यापिका नीना गुप्ता यांचा युवा गणितज्ञासाठीच्या रामानुजन पुरस्काराने गौरव
Posted On:
22 FEB 2022 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2022
कोलकाता येथील भारतीय सांख्यिकी संस्थेतील प्राध्यापिका नीना गुप्ता यांना आज 22 फेब्रुवारी 2022 ला झालेल्या आभासी समारंभात वर्ष 2021चा युवा गणितज्ञासाठीचा रामानुजन पुरस्कार प्रदान करण्यात आला. अफाइन अल्जेब्रिक जॉमेट्री आणि कम्युटेटिव्ह अल्जेब्रा या विषयांतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सचिव आणि विभागातर्फे गुप्ता यांचे अभिनंदन करताना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे प्रमुख संजीव वर्शनी म्हणाले की महिला संशोधकाला दिलेल्या या पुरस्कारामुळे जगभरातील महिला संशोधकांना गणित हा विषय त्यांचे करियर म्हणून निवडण्यास प्रोत्साहन मिळेल.
आयसीटीपी अर्थात आंतरराष्ट्रीय थीऑरॉटीकल फिजिक्स केंद्र आणि आंतरराष्ट्रीय गणित युनियन आणि भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रायोजित हा पुरस्कार दर वर्षी विकसनशील देशातील संशोधकाला देण्यात येतो.
विकसनशील देशामध्ये उल्लेखनीय संशोधन कार्य करणाऱ्या 45 वर्षांहून कमी वय असलेल्या तरुण गणितज्ञाला हा पुरस्कार दिला जातो.
अल्जेब्रिक जॉमेट्री या विषयातील मुलभूत समस्या असलेल्या झरीस्की कॅन्सलेशन या समस्येची उकल करणाऱ्या प्राध्यापिका नीना गुप्ता यांनी शोधलेल्या उत्तराने त्यांना 2014 या वर्षीचा भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार मिळवून दिला होता.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1800412)
Visitor Counter : 243