ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे डाळींच्या दरात घट


तूर डाळीच्या अखिल भारतीय घाऊक दरात 2.87% घट

सुरळीत आणि विना अडथळा आयात सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने 15 मे 2021 पासून 'मुक्त श्रेणी' अंतर्गत तूर, उडीद आणि मूग आयातीला परवानगी दिली

Posted On: 22 FEB 2022 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2022

 

देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि अत्यावश्यक अन्नपदार्थांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने अनेक सक्रिय उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमुळेच तूर डाळीच्या दरात मोठी घट झाली आहे.

ग्राहक व्यवहार विभागाच्या (DoCA) अधिकृत आकडेवारीनुसार, 22.02.2022 रोजी  तूर/अरहर डाळीची सरासरी घाऊक किंमत 9255.88 रुपये प्रति क्विंटल होती जी गेल्या वर्षी  22.02.2021 रोजी 9529.79 प्रति क्विंटल होती, यात 2.87% ची घट झाली आहे.

मे  2021 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अत्यावश्यक खाद्यपदार्थांच्या किमतींवर देखरेख  ठेवण्यासाठी आणि अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 अंतर्गत गिरण्या, आयातदार आणि व्यापाऱ्यांकडे असलेल्या डाळींच्या साठ्याची माहिती सार्वजनिक करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. मूग वगळता सर्व डाळींवर साठा मर्यादा लागू करण्याबाबत 02.07.2021 रोजी अधिसूचित करण्यात आले.  त्यानंतर, 19.07.2021 रोजी 31.10.2021 पर्यंतच्या कालावधीसाठी तूर, उडीद, मसूर, चणा या चार डाळींवर साठा  मर्यादा लागू करून सुधारित आदेश जारी करण्यात आला.

डाळींची उपलब्धता सुधारण्यासाठी आणि किमती स्थिर करण्यासाठी, सुरळीत आणि विना अडथळा आयात सुनिश्चित करण्यासाठी सरकारने 15 मे 2021 पासून 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत 'मुक्त श्रेणी' अंतर्गत तूर, उडीद आणि मूग आयातीला परवानगी दिली आहे. तूर आणि उडदाच्या आयातीसंदर्भातील मुक्त व्यवस्था  31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली.  आयात धोरणामुळे तूर, उडीद आणि मूग यांच्या आयातीत गेल्या दोन वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.


* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1800379) Visitor Counter : 185