अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारत सरकार, जागतिक बँकेने “नाविन्यपूर्ण विकासाद्वारे कृषी लवचिकतेसाठी पाणलोट क्षेत्र पुनरुज्जीवित करणे ” (REWARD) प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 115 दशलक्ष डॉलर्स कर्जाच्या करारावर केली स्वाक्षरी

Posted On: 18 FEB 2022 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2022

 

भारत सरकार, कर्नाटक आणि ओदिशा  राज्य सरकारे आणि जागतिक बँकेने  “नाविन्यपूर्ण विकासाद्वारे  कृषी लवचिकतेसाठी पाणलोट क्षेत्र पुनरुज्जीवित करणे ” संबंधी 115 दशलक्ष डॉलर्स (869 कोटी रुपये) कार्यक्रमावर स्वाक्षरी केली आहे, जो राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय संस्थांना  हवामान बदलासाठी शेतकऱ्यांची लवचिकता वाढवणे , उच्च उत्पादकता आणि चांगले उत्पन्न मिळवण्यात मदत करण्यासाठी सुधारित पाणलोट व्यवस्थापन पद्धतीचा  अवलंब करण्यास मदत करेल.

भारत सरकार 2030 पर्यंत 26 दशलक्ष हेक्टर निकृष्ट जमीन पूर्ववत  करण्यासाठी आणि 2023 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वचनबद्ध आहे.  प्रभावी पाणलोट व्यवस्थापन अधिक लवचिक अन्न प्रणाली तयार करताना, पावसावर अवलंबून असलेल्या भागात उपजीविका वाढवण्यात मदत करू शकते. या संदर्भात, नवीन कार्यक्रम सहभागी राज्य सरकारांना पाणलोट नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये परिवर्तन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये आणि विज्ञान-आधारित नियोजनाचा अवलंब करण्यात मदत करेल आणि देशभरात त्याचे अनुकरण केले जाऊ  शकते. तसेच  सहभागी आणि इतर राज्यांना पाणलोट विकासासाठी नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यास मदत करेल.

भारतामध्ये जगातील सर्वात मोठ्या पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम सर्वसमावेशक स्थानिक डेटाचा वापर  आणि तंत्रज्ञान, निर्णयाचे समर्थन करणारी साधने आणि ज्ञानाचे आदानप्रदान विकसित करून  प्रगतीला चालना देईल.  

 

* * *

S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1799428) Visitor Counter : 217


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil