राष्ट्रीय वित्तीय परीक्षण प्राधिकरण
azadi ka amrit mahotsav

‘एनएफआरए’डोमेन अंतर्गत 31 मार्च 2021 रोजी कंपन्यांचा तात्पुरता डेटा बेस आणि त्यांचे लेखापरीक्षक यांची अद्ययावत माहिती उपलब्ध

Posted On: 18 FEB 2022 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2022

 

नॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग अथॉरिटी (NFRA) ने ‘एनएफआरए’च्या नियामक कक्षेत येणाऱ्या कंपन्या आणि लेखापरीक्षकांचा डेटा बेस तयार केला आहे . आपली जबाबदारी  पार पाडण्यासाठी ‘एनएफआरए’ ने 31.3.21 रोजी सदर डेटाबेस अद्ययावत केला आहे. यामध्ये 5,563 सूचीबद्ध कंपन्या, 1,156 असूचीबद्ध कंपन्या आणि 101 विमा आणि बँकिंग कंपन्यांसह 6,820 कंपन्यांचा समावेश आहे. या संस्थांच्या 2,079 लेखापरीक्षकांचे तपशील देखील डेटा बेसमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.

या डेटा बेसच्या निर्मितीमध्ये प्राथमिक डेटा स्त्रोताची ओळख आणि पडताळणी आणि वेगवेगळ्या स्त्रोतांकडील डेटा (जसे की कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर (CIN) जो कार्यशील आहे) संकलन या कामांचा समावेश आहे. या संदर्भात, एनएफआरए कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA) च्या कॉर्पोरेट डेटा मॅनेजमेंट (CDM) विभाग आणि भारतातील तीन मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजेसशी संलग्न आहे.

डेटा बेस https://www.nfra.gov.in/nfra_domain  येथे उपलब्ध आहे

एनएफआरए विषयी माहिती - 

नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी (NFRA) ही कंपनी कायदा, 2013 च्या कलम 132 अंतर्गत स्थापन केलेली एक नियामक संस्था आहे . एनएफआरए  नियम 2018 च्या नियम 3 मध्ये परिभाषित केल्यानुसार सार्वजनिक हित संस्था (PIEs) आणि त्यांच्या वैधानिक लेखा परीक्षकांद्वारे लेखा आणि लेखापरीक्षण मानकांचे पालन करते. अशा सार्वजनिक हित संस्थामध्ये सर्व सूचीबद्ध कंपन्या आणि मोठ्या सार्वजनिक असूचीबद्ध कंपन्याचा समावेश असतो.

 

* * *

S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1799332) Visitor Counter : 250