आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आरोग्य मंत्रालयाने राज्ये/केंद्र शासित प्रदेशांकडून, आत्मनिर्भर भारत -आरोग्य आणि निरामयता केंद्र येथे टेली-आरोग्य सल्ला सेवेच्या कार्यान्वयनाचा आणि ईसीआरपी निधीच्या त्वरित वापराचा घेतला आढावा
राज्यांना 1.10 लाख आत्मनिर्भर भारत– आरोग्य आणि निरामयता केंद्रांतील टेली-आरोग्य सल्ला सेवेच्या वापराचा वेग 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्याचे आवाहन
राज्यांनी ईसीआरपी – II अंतर्गत असलेले प्रकल्प वेगाने पूर्ण करावे
Posted On:
17 FEB 2022 7:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2022
केंद्रीय आरोग्य सचिव, राजेश भूषण यांनी आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आत्मनिर्भर भारत – आरोग्य आणि निरामयता केंद्र येथे टेली-आरोग्य सल्ला सेवेच्या कार्यान्वयनाचा आणि ईसीआर निधीच्या वापराच्या तसेच ईसीआरपी –II आणि पंतप्रधान आत्मनिर्भर भारत निरोगी भारत योजने अंतर्गत प्रत्यक्ष आणि आर्थिक प्रगतीच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीची अध्यक्षता केली.

भारत सरकार देशभरात सार्वजनिक आरोग्य सेवा देण्यास कटीबद्ध आहे हे अधोरेखित करत, विस्तृत सादरीकरणाच्या माध्यमातून राज्यांना आत्मनिर्भर भारत– आरोग्य आणि निरामयता केंद्र, त्यांचे टेली सल्ला केंद्र म्हणून कार्यान्वयन आणि ईसीआरपी – II अंतर्गत प्रकल्पांची सद्यस्थिती या विषयी माहिती देण्यात आली.
आयुषमान भारत योजने अंतर्गत सर्वंकष प्राथमिक आरोग्य सुविधा (CPHC) सुनिश्चित करण्यासाठी उप आरोग्य केंद्रे (SHCs) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHCs) यांचे आरोग्य आणि निरामयता केंद्र म्हणून सक्षमीकरण करण्यात येत आहे, हे केंद्रीय आरोग्य सचिवांनी अधोरेखित केले. प्रजोत्पादन आणि बाल आरोग्य सेवा, संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग, दीर्घकाळ आजारी असलेल्यांची शुश्रुषा, तोंडचे आरोग्य, कान – नाक – घसा उपचार आणि मुलभूत आकस्मिक उपचार यासारख्या विस्तारित सेवांसाठी प्रतिबंधात्मक, आरोग्याला प्रोत्साहन देणाऱ्या आणि उपचारात्मक सेवा देण्यासाठी आरोग्य आणि निरामय केंद्रे महत्वाची आहेत. आरोग्य आणि निरामयता केंद्र – उप आरोग्य केंद्र आणि शहरी आणि ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रात मध्यम स्तरावरील आरोग्य सेवादाते/समुदाय आरोग्य अधिकारी यासारखे प्रशिक्षित अधिकारी नियुक्त केले जात आहेत. हे अधिकारी त्यांच्या संबंधित आरोग्य केंद्रांत या सेवा उपलब्ध करून देतील. आरोग्य आणि निरामयता केंद्रे आरोग्य सेवा आणि टेली सल्ला/रेफरल सेवांची व्याप्ती वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावतील.
राज्यांना स्थानिक गरजांच्या अनुरूप लक्षित रणनीती आखून 1.10 लाख आत्मनिर्भर भारत – आरोग्य आणि निरामयता केंद्रांतील टेली-आरोग्य सल्ला सेवेच्या वापराचा वेग 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्या सल्ला देण्यात आला. याचा अर्थ असा आहे, की ही आरोग्य आणि निरामयता केंद्रे पूर्णपणे कार्यान्वित असावी आणि मोफार औषधे, मोफत रोगनिदान आणि योग आणि निरामयता सत्र या सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात.
सर्व 1.10 लाख आत्मनिर्भर भारत– आरोग्य आणि निरामयता केंद्रे परिणामकारक टेली सल्ला केंद्रे म्हणून काम करण्यास पूर्णपणे सज्ज असावीत असा सल्लाही त्यांना देण्यात आला. यात मुख्य आरोग्य अधिकाऱ्यासह इंटरनेट जोडणी, संगणक/लॅपटॉप आणि आवश्यक प्रशिक्षित आणि कुशल कामगार समाविष्ट आहेत. सर्व आरोग्य आणि निरामयता केंद्रे एका मुख्य केंद्राशी जोडलेली असावीत जी, जिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय असेल. या सर्व केंद्रांसाठी राज्यांनी आज पासूनच किमान टेली सल्ला सत्र घेतली जातील हे सुनिश्चित करावे.
ईसीआरपी – II पॅकेजअंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीचा देशातील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासठी वेगाने वापर करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला (कारण न वापरला गेलेला निधी 31 मार्च 2022 ला परत जाईल), ईसीआरपी – II पॅकेजअंतर्गत प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे राज्यांना स्मरण करून देण्यात आले, जेणेकरून निधीचे पुढील हप्ते देणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला शक्य होईल. निवडणूक होत असलेल्या राज्यांत या निधीचा वापर करण्याची भारताच्या निवडणूक आयोगाकडून आवश्यक सूट मिळविण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
त्या शिवाय, ईसीआरपी – II पॅकेजच्या काही भागांचा उरलेला निधी राज्य आरोग्य संस्थांच्या परवानगीने वापरता येईल. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पुन्हा परवानगी घेण्याची गरज नाही.
पंतप्रधान –आत्मनिर्भर भारत सुदृढ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पाठविण्यात येणाऱ्या प्रास्तव आणि सामंजस्य करारांना वेग देण्याची विनंती करण्यात आली, जेणेकरून राज्यांना निधी वाटप करता येईल. राज्यांना या दिशेने झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले.
व्यवस्थापकीय संचालक आणि ए एस विकास शील, सह सचिव विशाल चौहान, सहसचिव लव अग्रवाल, आणि राष्ट्रीय आरोग्य मिशन संचालक आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांसह केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी या आभासी बैठकीला उपस्थित होते.
S.Thakur/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1799103)