ऊर्जा मंत्रालय

उर्जा आणि नूतन आणि नवीकरणीय उर्जा मंत्र्यांनी भूषवले चौथ्या भारत- ऑस्ट्रेलिया उर्जा संवादाचे अध्यक्षपद


दोन्ही बाजूंकडून नवीकरणीय उर्जा, उर्जा कार्यक्षमता, साठवणूक, विद्युत वाहने, महत्त्वाची खनिजे आणि आपापल्या देशातील उर्जा संक्रमण आणि खाणकाम यावर भर देत आपापल्या देशातील उर्जा संक्रमणाबाबत चर्चा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकडून नूतन आणि नवीकरणीय उर्जा तंत्रज्ञानाच्या इरादापत्रावर स्वाक्षऱ्या

Posted On: 15 FEB 2022 7:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2022

15 फेब्रुवारी 2022 रोजी चौथ्या भारत- ऑस्ट्रेलिया उर्जा संवादाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय उर्जा आणि नूतन आणि नवीकरणीय उर्जामंत्री आर के सिंग यांनी भारतीय बाजूकडून आणि उर्जा आणि उत्सर्जन कपातमंत्री ऍन्गस टेलर यांनी ऑस्ट्रेलियाकडून या संवादाचे अध्यक्षपद भूषवले.

या चर्चेमध्ये मुख्यत्वे उर्जा संक्रमण हा प्रमुख मुद्दा होता आणि दोन्ही उर्जामंत्र्यांनी नवीकरणीय उर्जा, उर्जा कार्यक्षमता, साठवणूक, विद्युत वाहने, महत्त्वाची खनिजे आणि आपापल्या देशातील उर्जा संक्रमण आणि खाणकाम यावर भर देत आपापल्या देशातील उर्जा संक्रमणाबाबत चर्चा केली. विकसनशील देशांना उर्जा संक्रमणाची उद्दिष्टे साध्य करता यावीत यासाठी हवामान अर्थसहाय्याच्या आवश्यकतेची बाब देखील भारताकडून अधोरेखित करण्यात आली.

नूतन आणि नवीकरणीय उर्जा तंत्रज्ञानाच्या इरादापत्रावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी या संवादाच्या वेळी स्वाक्षऱ्या केल्या. या इरादापत्रामुळे नूतन आणि नवीकरणीय उर्जा तंत्रज्ञानाचा खर्च कमी करण्यासाठी आणि जागतिक उत्सर्जनात कपात करण्यासाठी त्याच्याशी संबंधित उभारणी गतिमान करण्यासाठी काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अतिशय कमी खर्चाची सौर आणि स्वच्छ हायड्रोजन सामग्रीचे उत्पादन आणि उभारणी वेगाने करण्यावर या इरादापत्राचा भर आहे.

भारत ऑस्ट्रेलिया उर्जा संवादाअंतर्गत मुख्यत्वे उर्जा, नूतन आणि नवीकरणीय उर्जा, कोळसा आणि खनिजे, महत्त्वाची खनिजे आणि तेल आणि वायू या पाच संयुक्त कार्यगटांनी सहअध्यक्षपद भूषवले आणि आतापर्यंतची प्रगती आणि संबंधित संयुक्त कार्यगटांतर्गत भावी कृती योजना याचे सादरीकरण केले.

स्वच्छ उर्जेच्या दिशेने संक्रमण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर तातडीने भर देण्याची गरज आहे. या संदर्भात सहमती झालेल्या भावी कृती योजनेमध्ये उर्जा कार्यक्षमता तंत्रज्ञान, ग्रीड व्यवस्थापन, फ्ल्यू गॅस डिसल्फरायझेशनवर संशोधन आणि विकास सहकार्य, बायोमास किंवा हायड्रोजन को- फायरिंग, वॉटर सायकल ऑप्टिमायजेशन, नवीकरणीय एकात्मिकरण, बॅटरी आणि विद्युत वाहने यांचा समावेश होता.

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1798594) Visitor Counter : 230