राष्ट्रपती कार्यालय

गुरु रविदास जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

Posted On: 15 FEB 2022 7:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2022

गुरु रविदास यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गुरु रविदासजी यांच्या जयंतीच्या या शुभ प्रसंगी मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत आहे, असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

गुरु रविदास एक महान संत, कवी आणि समाजसुधारक होते. आपल्या भक्तीगीतांमधून त्यांनी सामाजिक कुप्रथांचे उच्चाटन करण्याचा आणि समाजात सौहार्द निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भक्ती संप्रदायामधील एक आघाडीचे कवी म्हणून ते ओळखले जातात.

त्यांनी परस्परांमध्ये स्नेह आणि लोकांमध्ये समानतेची भावना वाढीला लावण्याचा प्रयत्न केला. त्यांची शांतता आणि बंधुभावाची शिकवण आजच्या काळात जास्तच समर्पक आहे. अतिशय ज्ञानी आध्यात्मिक व्यक्ती आणि समाज सुधारक असल्याने गुरु रविदास यांनी नेहमीच त्यांच्या अनुयायांना कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि संयम याचा मार्ग अनुसरण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करण्याची आणि समानता आणि सौहार्दावर आधारित समाजाची उभारणी करण्याची आपण प्रतिज्ञा करुया.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

S.Tupe/S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1798574) Visitor Counter : 177