PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
14 FEB 2022 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 14 फेब्रुवारी 2022


- Over 173 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- India's Active caseload currently stands at 4,78,882
- Active cases stand at 1.12%
- Recovery Rate currently at 97.68%
- 91,930 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,16,77,641
- 34,113 new cases recorded in the last 24 hours
- Daily positivity rate (3.19%)
- Weekly Positivity Rate (3.99%)
- 75.18 cr Total Tests conducted so far; 10,67,908 tests conducted in the last 24 hours
|
#Unite2FightCorona #IndiaFightsCorona


आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 11 लाख 66 हजारांहून अधिक (11,66,993) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 172 कोटी 95 लाखांचा (1,72,95,87,490) टप्पा ओलांडला आहे.
गेल्या 24 तासांत 91,930 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीच्या सुरवातीपासून) सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,16,77,641 झाली आहे.
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 97.68% झाला आहे.
गेल्या 24 तासांत, देशात 34,113 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 4,78,882 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.12% आहे.
कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेच्या विस्ताराचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 10,67,908 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 75 कोटी 18 लाखांहून अधिक (75,18,03,766) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.99% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 3.19%.इतका आहे.
इतर अपडेट्स :
S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798386)
अभ्यागत कक्ष : 212